शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
4
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
5
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
6
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
7
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
8
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
9
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
10
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
11
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
12
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
13
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
14
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
15
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
16
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
17
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
18
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
19
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
20
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन

कमान बांधकामाचा स्लॅब कोसळून दोन मजूर ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 11:10 IST

१४ जखमी : निधोना येथील दुर्घटना; गावावर शोककळा, मृत मजूर परभणी जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील निधोना येथे गाव प्रवेशद्वाराच्या कमानीचे बांधकाम सुरू असताना स्लॅब कोसळून दोन मजूर ठार, तर १४ जण जखमी झाले. यात एकाची प्रकृती चिंताजनक आहे. ही भीषण दुर्घटना मंगळवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली.

बाबरा : फुलंब्री तालुक्यातील निधोना येथे गाव प्रवेशद्वाराच्या कमानीचे बांधकाम सुरू असताना स्लॅब कोसळून दोन मजूर ठार, तर १४ जण जखमी झाले. यात एकाची प्रकृती चिंताजनक आहे. ही भीषण दुर्घटना मंगळवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली.

निधोना येथे लोकवर्गणीतून गावाबाहेर प्रवेशद्वाराच्या कमानीचे बांधकाम तीन महिन्यांपासून सुरू आहे. साईडच्या २५ फूट उंचीच्या दोन्ही खांबांचे काम पूर्ण करून मंगळवारी सायंकाळी आडवा स्लॅब टाकण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली. यावेळी स्लॅबवर सहा मजूर काम करीत होते, तर उर्वरित दहा मजूर खाली काम करीत होते. स्लॅबचे काम करीत असताना अचानक दोन बल्ल्या तुटल्या व स्लॅब खाली कोसळला, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. स्लॅबवरील सहापैकी दोन मजूर ठार झाले, तर उर्वरित चार जण व खाली असलेले दहा जण जखमी झाले.

मयतांची नावेसोनू आळणे (२१), बालाजी रामभाऊ भिसे (२७, सर्व रा. झोलम पिंप्री, ता. गंगाखेड जि. परभणी).

जखमींची नावेभागवत रामभाऊ भिसे (३०, रा. परभणी), तिरुपती सुरेश लवटे (२४), गणेश संजय आरके (२२), सुनील संजय राठोड (२१, तिघे रा. आनंदवाडी, ता. पालम, जि. परभणी), गोरख सांडू मोकासे, विशाल सपकाळ, सुरेश धनवई, सागर आहेर, राजू मोकासे, संदीप दवंगे, मनोज धनवई, रामचंद्र ओपलकर, गणेश मोकासे, सुनील मोकासे, दत्तू दवंगे (सर्व रा. पिशोर, ता. कन्नड).

या घटनेची माहिती कळताच मदतीसाठी गावकरी धावले. ग्रामस्थांनी सर्व जखमींना सिमेंट, रेतीच्या ढिगाऱ्याखालून काढले व तात्काळ घाटी रुग्णालयात पाठविले; परंतु तोपर्यंत दोघांनी प्राण सोडला. या दुर्घटनेने संपूर्ण गाव सुन्न झाले असून गावावर शोककळा पसरली आहे. प्रवेशद्वाराची रुंदी ४० फूट ठेवण्यात आली होती. निधोना येथील ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून सदरील काम करण्यात येत होते. पाणी फाऊंडेशनच्या खोलीकरणामुळे हे गाव एकजुटीने विकासकामे करण्यात मग्न झाले आहे; परंतु या दुर्दैवी घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. बाबरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्ञानेश पाटील हे रुग्णवाहिका व कर्मचाºयांना घेऊन तात्काळ मदतीसाठी धावले. वडोदबाजार पोलिसांनीही तात्काळ घटनास्थळी भेट देऊन मदतकार्य केले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी फुलंब्री ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले असून, जखमींवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEmployeeकर्मचारी