शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

दिलासादायक ! नवीन पाणीपुरवठा योजना सुरु होण्यापूर्वी शहराच्या पाणीपुरवठ्यात २० टक्के वाढीचे प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 14:28 IST

New Water Pipeline For Aurangabad महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता अजय सिंग यांच्याकडून प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी महापालिकेच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेतला.

ठळक मुद्देमहाराष्ट्र जीवन प्राधिकरण नियोजन करणार नवीन पाणीपुरवठा योजनेत ५३ पाण्याच्या टाक्या उभारण्यात येणार त्यातील २५ टाक्या तातडीने उभारण्यात येणार आहेत

औरंगाबाद : नवीन पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी आणखी तीन वर्षे लागणार आहेत. तोपर्यंत शहराला दिलासा देण्यासाठी पाणी पुरवठ्यात २० टक्के वाढ करता येऊ शकते का, यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे तज्ज्ञ अधिकारी यासंबंधीचा आराखडा तयार करून महापालिकेला सादर करणार असल्याची माहिती बुधवारी महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी दिली.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता अजय सिंग यांच्याकडून प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी महापालिकेच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेतला. त्यानुसार नवीन पाणीपुरवठा योजनेत ५३ पाण्याच्या टाक्या उभारण्यात येणार आहेत. त्यातील २५ टाक्या तातडीने उभारण्यात येणार असून, टाक्या उभ्या करण्यासाठी जागा निश्चित केलेली नाही. या टाक्यांसाठी जागेची तपासणी करण्यासाठी महापालिकेने स्वतंत्र पथक तयार केले आहे. यामध्ये शहर अभियंता, कार्यकारी अभियंता आणि प्रभाग अभियंता यांचा समावेश आहे. सध्या महापालिका ६० टक्के पाणीपुरवठा थेट टाक्यांवरून न करता, पाईपलाईनमधून करत आहे. त्यामुळे असंख्य नागरिकांना कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. यावेळी महापालिकेचे शहर अभियंता सखाराम पानझडे, प्रभारी कार्यकारी अभियंता किरण धांडे उपस्थित होते.

पाणी वाढविणे शक्‍यजायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत महापालिकेच्या जलवाहिन्या काही ठिकाणी अत्यंत कमकुवत झाल्या आहेत. या कमकुवत जलवाहिनीच्या बाजूने आणखी एक जलवाहिनी टाकून बायपास पद्धतीने पाणीपुरवठा करता येईल. या प्रक्रियेमुळे शहरात २० टक्के पाण्याची वाढ होऊ शकते, असा प्रस्ताव अजय सिंग यांनी महापालिकेला दिला. यासाठी लागणाऱ्या खर्चाचे अंदाजपत्रक लवकरच प्राधिकरणकडून सादर करण्यात येईल.

सौर विजेचा वापरसध्या महापालिकेला पाणीपुरवठा योजनेच्या वीजबिलाचा खर्च ५० ते ६० कोटी रुपये होत आहे. नवीन पाणीपुरवठा योजना आल्यानंतर हा खर्च किमान १२० ते १२५ कोटींपर्यंत जाईल. नक्षत्रवाडी येथील डोंगरावर दहा हेक्‍टर जागा वन विभागाकडून घेऊन सौर पॅनलचा प्रकल्प उभारण्याबाबतचा विचारही आजच्या बैठकीत करण्यात आला.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी