शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: नाशिक, दिंडोरीत ९ वाजेपर्यंत ६ टक्के मतदान
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
3
गुजरातच्या GST अधिकाऱ्याने साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; एकाही अधिकाऱ्याने केला नाही तपास
4
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
5
मेले ते गेले... तुमचे नातेवाईक नव्हतेच ते!
6
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
7
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
8
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
9
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
10
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
11
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
12
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
13
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
14
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
15
चॉकलेटच्या वडीचा आकार आता लहान होणार, कारण...
16
‘MPSC’ची ढकलगाडी; ...तर एमपीएससीच्या सक्षमीकरणाशिवाय पर्याय नाही
17
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
18
जलदगतीने वजन कमी करणे आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक, औषधांचा वापर टाळण्याचे आयसीएमआरचे आवाहन
19
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
20
बिल्डरच्या १७ वर्षीय मुलाने घेतला दाेघांचा बळी

प्रवाशांना थोडा दिलासा ! संपाच्या ४५ व्या दिवशी जिल्ह्यातील सर्वच बसस्थानकांतून धावली एसटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2021 12:34 PM

ST Strike : दिवसभरात २२१ फेऱ्या : साडेतीन हजार प्रवाशांनी केला प्रवास

औरंगाबाद : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या (ST Strike ) ४५ व्या दिवशी गुरुवारी औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वच बसस्थानकांतून एसटी धावली. दिवसभरात ८४ ‘एसटी’च्या २२१ फेऱ्या झाल्या (ST Bus ran through all the bus stands in the Aurangabad district) . यातून साडेतीन हजार प्रवाशांनी प्रवास केला.

एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण करावे, या मागणीसाठी अजूनही अनेक कर्मचारी कामावर परतण्यास तयार नाहीत. दुसरीकडे संघटनेने संप मिटल्याची घोषणा केल्यानंतर कामावर हजर होणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रमाण वाढले. परिणामी, एसटीची सेवाही सुरळीत होण्यास मदत होत आहे. जिल्ह्यात बुधवारी ६४२ एसटी कर्मचारी कामावर हजर होते. ही संख्या गुरुवारी ६८३ वर पोहोचली.

सिडको बसस्थानकातून जालना मार्गावर १० लाल परीने २६ फेऱ्या केल्या. यातून ६०९ प्रवाशांनी प्रवास केला. औरंगाबाद - बीड मार्गावर १२ बसच्या १८ फेऱ्यातून ३४३ प्रवाशांनी प्रवास केला. मध्यवर्ती बसस्थानकातून पुणे मार्गावर धावलेल्या १५ शिवशाही बसमधून ४८० प्रवाशांनी प्रवास केला. नाशिक मार्गावर ६ शिवशाहीने १२ फेऱ्या केल्या. औरंगाबाद - कन्नड मार्गावर ३ बसने ६ फेऱ्या केल्या, त्यात ९८ प्रवासी मिळाले. औरंगाबाद-सिल्लोड मार्गावर ४ बसने ८ फेऱ्या केल्या. बुलडाणा, जळगाव मार्गावर प्रत्येकी दोन तर पैठण, धुळे मार्गावर प्रत्येकी एक बस चालविण्यात आली. यासह जिल्ह्यातील अन्य सहा आगारांतूनही बसगाड्या धावल्या.

आजपासून कारवाईची शक्यताजे कर्मचारी कामावर परतणार नाही, अशांवर शुक्रवारपासून बडतर्फीची कारवाई करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दुसरीकडे एसटी शासनात विलीन करण्याच्या मागणीसंदर्भात ५ जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे तोपर्यंत आम्ही आमचा दुखवटा कायम ठेवणार असल्याचे कर्मचाऱ्यांतर्फे सांगण्यात आले.

टॅग्स :ST Strikeएसटी संपAurangabadऔरंगाबादpassengerप्रवासी