शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

'पैसे घेऊन चहा प्यायला या', सरपंच पत्नीसह पतीला ५० हजारांची लाच घेताना अटक

By सुमित डोळे | Updated: July 17, 2024 15:52 IST

गावाच्या विकासासाठी मंजूर ३ लाखांच्या निधीसाठी ५० हजार रुपयांची लाच घेताना टाकळीमाळी ग्रुप ग्रामपंचायतीच्या २६ वर्षीय सरपंच तरुणीसह तिचा पती अटकेत, एसीबीची कारवाई

छत्रपती संभाजीनगर : 'पैसे घेऊन चहा प्यायला या' असा कॉल करून उपसरपंचाकडून विकासनिधीसाठी लाच घेणाऱ्या टाकळीमाळी ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच दाम्पत्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) रंगेहाथ पकडले गेले. सरपंच ज्योती आनंद गवळी (२६) व तिचा पती आनंद रमेश गवळी (३२), अशी आरोपींची नावे आहेत. गावाच्या विकासासाठी मंजूर ३ लाखांच्या निधीसाठी ५० हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने मंगळवारी दुपारी ३ वाजता गवळी दाम्पत्याला त्यांच्याच घरातून अटक केली.

४३ वर्षीय तक्रारदार हे ग्रुप ग्रामपंचायत टाकळीमाळी येथे उपसरपंच आहेत. ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत हुसेनपूर गावासाठी पंधराव्या वित्त आयोगातून ३ लाखांचा विकासनिधी मंजूर झाला होता. उपसरपंच सातत्याने गवळी दाम्पत्याकडे तो निधी देण्यासाठी मागणी करत होते. आनंदने त्यांना ५० हजार रुपयांची लाच मागितली. यामुळे संतप्त उपसरपंचाने त्याची थेट एसीबी अधीक्षक संदीप आटोळे यांच्याकडे तक्रार केली.

घरातच सापळा, घरातच अटकगवळीने मंगळवारी उपसरपंचांना पैशांसाठी पुन्हा कॉल केला. 'पैसे घेऊन चहा प्यायला घरीच या' असे सांगितले. ही बाब कळताच निरीक्षक विजयमाला चव्हाण, अंमलदार राजेंद्र सिनकर, विलास चव्हाण, चांगदेव बागूल यांनी आरोपीच्या घरासमोर सापळा रचला. तक्रारदार पंचासह घरात गेले. चहा पिऊन झाल्यावर ज्योतीने ५० हजार रुपये स्वीकारताच घराबाहेर दबा धरून बसलेल्या पथकाने आत प्रवेश करत दोघांना अटक केली. ज्योती व आनंद दोघेही बारावी उत्तीर्ण असून, ज्योती गावाची तरुण सरपंच ठरली होती. मात्र, पैशांच्या लालसेपोटी थेट तुरुंगात ठाण्याची वेळ दोघांवर आली. करमाड पोलिस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागAurangabadऔरंगाबाद