शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

महाविद्यालयीन शैक्षणिक सत्र एक नोव्हेंबरपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 17:40 IST

गुरुवारी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली विद्या परिषदेची बैठक ऑनलाईन झाली.

ठळक मुद्देविद्या परिषदेच्या बैठकीत अनेक विषयांवर शिक्कामोर्तबया बैकीत कंत्राटी प्राध्यापक नियुक्तीच्या प्रस्तावावरून खडाजंगी झाली.

औरंगाबाद : कोविडमुळे विस्कळीत झालेल्या शैक्षणिक वेळापत्रकामुळे विद्यार्थी संभ्रमित आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने ऑनलाईन आयोजित केलेल्या विद्या परिषदेच्या बैठकीत एक नोव्हेंबरपासून महाविद्यालयीन शैक्षणिक सत्र सुरू करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. तर विद्यापीठ आणि महाविद्यालयीन पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शैक्षणिक सत्र नोव्हेंबर अखेरपर्यंत सुरू करण्यात येणार आहे. 

गुरुवारी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली विद्या परिषदेची बैठक ऑनलाईन झाली. बैठकीत प्रामुख्याने शैक्षणिक वेळापत्रक निश्चित करण्यावर बराच खल झाला. यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे महाविद्यालयीन तसेच विद्यापीठाचे अर्धे शैक्षणिक वर्ष प्रभावित झाले आहे. अलीकडे कोरोनाचा संसर्ग बऱ्यापैकी कमी झाला आहे. त्यामुळे १ नोव्हेंबरपासून नवीन शैक्षणिक सुरू करण्यावर विद्या परिषद सदस्यांचे एकमत झाले. मात्र, सध्या पदवीच्या अंतिम सत्र परीक्षा सुरू आहेत. दिवाळीपूर्वी या परीक्षांचा निकाल अपेक्षित आहे. त्यामुळे नोव्हेंबरअखेरपर्यंत पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अध्यापनाला सुरुवात करण्यावर बैठकीत निर्णय झाला.

या बैकीत कंत्राटी प्राध्यापक नियुक्तीच्या प्रस्तावावरून खडाजंगी झाली. विद्यापीठ निधीतून विविध विभागांत रिक्त जागांवर १८ कंत्राटी प्राध्यापकांच्या जागा विद्या परिषदेच्या मान्यतेनुसार भरण्यास व्यवस्थापन परिषदेने मंजुरी दिली होती. तो विषय आजच्या बैठकीत चर्चेसाठी आला. तेव्हा कंत्राटी प्राध्यापक भरतीसंदर्भात आरक्षणाचे पालन करण्यात आलेले नाही, असा मुद्दा उपस्थित करून अनेक सदस्यांनी या प्रस्तावास विरोध केला. १८ पैकी केवळ एकाच जागेवर आरक्षित उमेदवार भरणार, हे कोणत्या नियमानुसार ठरविण्यात आले. याचा जाब विचारण्यात आला; पण प्रशासनाला त्याचे समाधानकारक उत्तर देता आले नाही. त्यामुळे कंत्राटी प्राध्यापक पदाच्या भरतीसाठी नियमानुसार आरक्षणाचा निकष लावून नंतर तो विषय या सभागृहासमोर आणावा, असा ठराव घेऊन हा विषय परत व्यवस्थापन परिषदेकडे फेरविचारार्थ पाठविण्यात आला. 

अनेक विषयांना दुरुस्तीसह मान्यताआजच्या बैठकीत परदेशी विद्यार्थ्यांना पीएच.डी.साठी प्रवेश देण्याबाबतचा विषय चर्चेला आला. तेव्हा ते विद्यार्थी पात्र असतील, तरच त्यांचा पीएच.डी.साठी विचार व्हावा. विविध अभ्यासक्रमांना मान्यता देण्यापूर्वी ते विद्याशाखांकडून आले पाहिजेत. त्यावर विद्याशाखांची शिफारस नाही, यासह अनेक विषयांना दुरुस्तीसह मान्यता देण्यात आली. 

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducationशिक्षणStudentविद्यार्थी