शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी-पोलीस अधीक्षकांच्या पथकाने वाळूमाफियांचे ट्रॅक्टर, केणी मशीन जाळून केले नष्ट, १५० ब्रास साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2022 19:36 IST

जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक पथकासह कारवाईसाठी नदीपात्रात उतरेपर्यंत तस्करांच्या यंत्रणेला खबर मिळाली नाही.

पैठण (औरंगाबाद ) : स्थानिक प्रशासकीय यंत्रणेला भणक लागू न देता जिल्हाधिकारी सुनील चव्हाण व पोलीस अधीक्षक निमित्त गोयल यांनी स्वतः पथकासोबत जात गुरूवारी मध्यरात्री गोदावरी पात्रात वाळू माफियांवर कठोर कारवाई केली. पथकाने दीडशे ब्रास वाळूसाठा जप्त करून तस्करीसाठी वापरले जाणारे दोन ट्रॅक्टर, केणी मशीन व इतर साहित्य जाळून नष्ट केले.

पैठण तालुक्यातील गोदावरी पात्रातील एकाही वाळुपट्ट्याचा लिलाव झालेला नाही. परंतु,  स्थानिक अधिकऱ्यांवर नजर ठेवून तस्करांकडून सातत्याने वाळू उपसा सुरू आहे. पैठण शहरालगत असलेल्या पाटेगाव शिवारातील गोदावरी नदी पात्रात बेकायदा वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे आल्या होत्या. या तक्रारींच्या अनुषंगाने गुरुवारी मध्यरात्री जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस अधीक्षक निमीत गोयल,  उपविभागीय अधिकारी डॉ.स्वप्नील मोरे यांच्यासह पथकाने पाटेगाव शिवारातील गोदावरी नदी पात्रात धाड टाकली. 

पथक तिथे पोहोचले त्यावेळी गोदावरी नदीपात्रामध्ये विना क्रमांकाचे दोन ट्रॅक्टर, वायर रोप व यारी मशीनद्वारे केनीच्या सहाय्याने वाळू उपसा सुरू होता. पथकाला पाहताच वाहने व साहित्य तेथेच सोडून अंधारात गोदावरी पात्रातील पाण्यात उड्या मारून तस्करांनी धूम ठोकली. पथकाने जवळपास १५० ब्रास वाळूसाठा जप्त करून पाटेगाव तलाठ्याच्या ताब्यात देण्यात आल्याचे उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे यांनी सांगितले. तसेच यापुढेही अवैध वाळू उपशावर स्वतः जिल्हाधिकारी सुनील चव्हाण कारवाई करणार आहेत. यामुळे वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहेत.  

कारवाईच्या भितीने तस्कर फरार...जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक पथकासह कारवाईसाठी नदीपात्रात उतरेपर्यंत तस्करांच्या यंत्रणेला खबर मिळाली नाही. यामुळे वाळू तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, यापुढे तस्करावर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिला आहे. दरम्यान, पथकाची कारवाई सुरु असल्याचे समजताच पैठण ते हिरडपुरी दरम्यान रात्री सुरू असलेला अवैध वाळू उपसा बंद करून तस्कर फरार झाले. शुक्रवारी सुध्दा तस्करी करणारे शहरातून व गावातून फरार असल्याची माहिती आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादsandवाळू