शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
4
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
5
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
6
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
7
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
8
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
9
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
10
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
11
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
12
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
13
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
14
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

कारवर पेटते झाड कोसळून एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 12:56 AM

रस्त्याच्या कडेला जळत असलेला वडाचा वृक्ष कारवर कोसळून एक जण ठार तर सहा जण जखमी झाल्याची घटना औरंगाबाद-वैजापूर महामार्गावरील किन्हळ फाट्याजवळ मंगळवारी सायंकाळी ७ वाजता घडली. अपघातामुळे वाहतूक खोळंबली होती.

लासूर स्टेशन : रस्त्याच्या कडेला जळत असलेला वडाचा वृक्ष कारवर कोसळून एक जण ठार तर सहा जण जखमी झाल्याची घटना औरंगाबाद-वैजापूर महामार्गावरील किन्हळ फाट्याजवळ मंगळवारी सायंकाळी ७ वाजता घडली. अपघातामुळे वाहतूक खोळंबली होती.मारुती लक्ष्मण कसारे (६२ रा. मिसरवाडी ) असे मयताचे नाव आहे. इतर गंभीर जखमींमध्ये अनिता खंडागळे, रवी कसारे, सुनिता खरात, नानुबाई कसारे, बाळू खंडागळे व एक चार वर्षाचा बालक यांचा समावेश आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.पोलिसांनी सांगितले की, वैजापूरकडून औरंगाबादकडे जाणाऱ्या कारमधून (क्र. एमएच- ०४ डीबी- ९८८३) सात जण प्रवास करीत होते. मात्र, किन्हळ फाट्याजवळ जळत असलेला वडाचा वृक्ष कोसळला. त्यात मारुती हे गंभीर जखमी झाले. त्यांना रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले.जखमींना पोलीस पाटील हेमंत पठारे, माजी सरपंच तुकाराम पवार व ग्रामस्थांनी मदत केली.या अपघाताला सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी जबाबदार असून त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करून मयताच्या नातेवाईकांनी प्रेत ताब्यात घेण्यास नकार दिला. सिल्लेगाव ठाण्याचे पोनि.बालक कोळी, अप्पासाहेब काळे, विनोद बिघोत, सुनील दांडगे, विठ्ठल जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली.

टॅग्स :AccidentअपघातPoliceपोलिस