शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

झालर आराखडा, बीड बायपासची वर्कऑर्डर अडकणार आचारसंहितेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 18:35 IST

निवडणुकीनंतरच धोरण 

ठळक मुद्दे१५ हजार ८४३ हेक्टरचा आराखडा३८३ कोटींची बायपासची निविदा

औरंगाबाद : सिडकोने २६ गावांसाठी तयार केलेला झालर क्षेत्र विकास आराखडा आणि ३८३ कोटी रुपयांची बीड बायपास रुंदीकरणाची निविदा विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकण्याची शक्यता आहे. 

बायपाससाठी १८ सप्टेंबर रोजी निविदा अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू झाली. १९ सप्टेंबर रोजी या कामासाठी किती निविदा प्राप्त झाल्या, याची माहिती समोर येईल, तर झालर क्षेत्र विकास आराखड्याबाबत अंतिम निर्णय होण्याची प्रक्रिया ठप्प पडल्याची माहिती सिडको सूत्रांनी दिली. सिडकोचे सूत्र म्हणाले, पुढच्या आठवड्यापर्यंत आराखड्याची अधिसूचना निघेल, अशी अपेक्षा आहे, आचारसंहितेचा यावर परिणाम होणार नाही. तो प्रशासकीय निर्णय असणार आहे. आराखड्याचे काम शेवटच्या टप्प्यात आले आहे. बीड बायपासच्या रुंदीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने डीपीआर तयार केला असून, त्यानुसार निविदा मागविल्या आहेत. गुरुवारी सायंकाळपर्यंत निविदांची माहिती समोर येईल, असे बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सुरेश देशपांडे यांनी सांगितले. ते म्हणाले, आचारसंहितेत बायपासची वर्कआॅर्डर देता येणार नाही. त्यामुळे निवडणुकीनंतरच वर्कआॅर्डर देता येईल. निविदांची छाननी, तांत्रिक व आर्थिक निविदा पडताळणी दरम्यानच्या काळात होईल. दरम्यान, शासनाने तीन महिन्यांपूर्वी बायपासच्या कामासाठी ३८३ कोटींचे अनुदान जाहीर केले. त्याचा डीपीआर बांधकाम विभागाने केला असून, उपलब्ध निधीतून जी कामे करण्यात येणार आहेत, त्याचा समावेश आहे. 

आराखड्याने पाहिल्या तीन विधानसभा सिडकोच्या झालर क्षेत्र विकास आराखड्याने आजवर तीन विधानसभा निवडणुका पाहिल्या. ३० नोव्हेंबर २००८ रोजी अधिसूचना निघाली. त्यानंतर २००९ च्या विधानसभा निवडणुका लागल्या. २०११ साली आराखड्यात भूआरक्षणात मोठे घोळ केले. त्यामुळे तो रद्द करण्यात आला. २०१४ पर्यंत आरक्षण फेरबदल, आक्षेप, हरकती व सूचनांमध्ये वेळ गेला. त्यानंतर २०१४ च्या विधानसभा निवडणुका झाल्या. या पाच वर्षांत आराखडा मंजूर होईल, असे वाटले होते; परंतु २०१९ च्या विधानसभा निवडणुका तोंडावर येऊनही आराखडा अंतिम करून शासनाने अधिसूचना काढली नाही. झालर क्षेत्राचा बहुतांश भाग फुलंब्री मतदारसंघात आहे. त्यामुळे आराखडा मंजूर होण्याबाबत शासनाची काय भूमिका आहे, हे जाणून घेण्यासाठी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे म्हणाले की, दोन दिवसांपूर्वी सचिव नितीन करीर यांच्याशी बोलणे झाले होते. आचारसंहितेपूर्वी आराखडा मंजूर होईल, असे वाटते. उद्या पुन्हा संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करील. 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabadऔरंगाबादfundsनिधीvidhan sabhaविधानसभा