ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी ‘क्लस्टर’चे भरीव योगदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 04:05 AM2021-02-28T04:05:57+5:302021-02-28T04:05:57+5:30

औरंगाबाद : औद्योगिक क्षेत्रात लागणारे कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्या वतीने ‘संकल्प’ उपक्रमांतर्गत तज्ज्ञ ...

Cluster's significant contribution to the automobile sector | ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी ‘क्लस्टर’चे भरीव योगदान

ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी ‘क्लस्टर’चे भरीव योगदान

googlenewsNext

औरंगाबाद : औद्योगिक क्षेत्रात लागणारे कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्या वतीने ‘संकल्प’ उपक्रमांतर्गत तज्ज्ञ प्रशिक्षक तयार करण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गत ‘ट्रेन द ट्रेनर’ हे पहिले ऑनलाईन चर्चासत्र मराठवाडा ऑटो क्लस्टरमध्ये शनिवारी झाले. ऑटोमोबाईल क्षेत्रातील तज्ज्ञ प्रशिक्षक निर्माण करण्याचा पहिला मान देशात औरंगाबादेतील मराठवाडा ऑटो क्लस्टरला मिळाला आहे, हे विशेष.

केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय, ऑटोमोटिव्ह स्किल डेव्हलपमेंट कौन्सील, जेआयझेड , महाराष्ट्र स्किल डेव्हलपमेंट सोसायटी आणि मराठवाडा ऑटो क्लस्टर यांच्या संयुक्त विद्यमाने हे चर्चासत्र घेण्यात आले. मराठवाडा ऑटो क्लस्टरचे अध्यक्ष मुनिष शर्मा आणि व्यवस्थापकीय संचालक जयंत पाडाळकर यांच्या हस्ते चर्चासत्राचे उदघाटन झाले. ‘संकल्प’ च्या रश्मी मेहरा यांनी या उपक्रमाची रूपरेषा स्पष्ट केल्यानंतर ऑटोमोटिव्ह स्किल डेव्हलपमेंट कॉन्सील (एएसडीसी) चे मुख्य कार्यकारी अधिकारी अरिंदम लाहिरी यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, प्रशिक्षकांचा दर्जा त्यांना मिळणाऱ्या प्रशिक्षणावर ठरतो. त्यामुळे प्रशिक्षण आराखडाही उच्च दर्जाचा असला पाहिजे. केवळ पुस्तकी ज्ञान देऊन चालणार नाही, तर त्याला प्रात्यक्षिक ज्ञानाचीही जोड हवी. ‘जीआयझेड’चे तांत्रिक सल्लागार रविशंकर कोरगल यांनी ‘ट्रेन द ट्रेनर’ या उपक्रमाची गरज स्पष्ट केली.

यावेळी ‘मासिआ’चे अध्यक्ष अभय हंचनाळ, शिवप्रसाद जाजू, अभय देशमुख, मंदार महाजन, मनीष रावके या मान्यवरांनी प्रशिक्षण कार्यक्रमाची रूपरेषा कशी असावी, याबाबत सूचना केल्या. सूत्रसंचालन विवेक कोरंगळेकर व शिरीष लोया यांनी केले. तर ऑटो क्लस्टरचे संचालक आशिष गर्दे यांनी आभार मानले.

चौकट......

काय आहे संकल्प उपक्रम ?

केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाने कुशल मनुष्यबळाची वाढती मागणी लक्षात घेऊन जागतिक बँकेच्या सहकार्याने संकल्प उपक्रमाची सुरुवात केली आहे. रोबोटिक्स टेक्नोलॉजी, सीएनसी प्रोग्रामिंग आणि अत्याधुनिक वेल्डिंग टेक्नॉलॉजी या विषयातील तज्ज्ञ प्रशिक्षक संकल्प उपक्रमात तयार करण्यात येणार आहेत. पंचवीस जणांची पहिली बॅच यावर्षी संकल्प उपक्रमात तयार करण्यात येणार आहे.

Web Title: Cluster's significant contribution to the automobile sector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.