शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

ढगफुटी सदृश्य पावसाने ५० घरे वाहून गेली; ३०० कुटुंबाचे संसार रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2021 19:44 IST

Rain in Aurangabad रात्रीच्या पुरात घरे वाहून गेलेल्या कुटुंबियांना ग्रामस्थांनी अथक परिश्रम करून पुराच्या बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलविले.

सोयगाव ( औरंगाबाद ) : सोयगाव तालुक्याला सोमवारी रात्री झालेल्या आठ तासांच्या संततधार ढगफुटीच्या पावसामुळे रात्री चार वाजेनंतर निंबायती गावालगत असलेल्या नाल्याला आलेल्या महापुरात पन्नास घरे पाण्यात वाहून गेल्याची खळबळजनक घटना मंगळवारी पहाटे उघडकीस आली.

रात्रीच्या पुरात घरे वाहून गेलेल्या कुटुंबियांना ग्रामस्थांनी अथक परिश्रम करून पुराच्या बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलविले. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याची माहिती तहसीलदार रमेश जसवंत यांनी दिली. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार रमेश जसवंत यांनी तातडीने निंबायतीला महसूलचे मदत पथक पाठविले.परंतु नाल्याच्या पुरात हे पथकही अडकल्याने दुपारी उशिरा या घटनेची पथकांकडून पाहणी करण्यात आली होती.

वानटाकळीत पुराचे पाणी घुसले,शेतकऱ्यांनी चिंचेच्या झाडावर रात्र काढली

ग्रामस्थ सुरक्षितस्थळी अतिवृष्टीच्या तडाख्यात निंबायती गावात मोठा फटका बसला आहे. याबाबत पाहणी केली असून तातडीने नुकसान झालेल्या घरांचे पंचनामे करून अहवाल पाठविण्याच्या सूचना पथकाला दिलेल्या आहेत. बेघर झालेली नागरिक सुरक्षितस्थळी आहेत. संबंधित ग्रामसेवकाला या नागरिकांची काळजी घेण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत.- रमेश जसवंत, तहसीलदार सोयगाव

 

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबाद