शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

जिवलग मित्रच निघाला रेल्वे स्थानकावरील हमालाचा खूनी, मध्य प्रदेशातून आरोपी ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2024 20:26 IST

लोहमार्ग पोलिसांनी मध्य प्रदेशातून आरोपीला घेतले ताब्यात

छत्रपती संभाजीनगर : रेल्वे स्थानकावर धारदार शस्त्राने वार करून योगेंद्र किशोरीलाल उईके (वय ३९) याची हत्या करण्यात आली होती. सलग सहा दिवस तपास करून लोहमार्ग पोलिसांनी त्याचा जीवलग मित्र असलेला मारेकरी अनिल सेवकराव उईके (२५) याला मध्य प्रदेशातून अटक केली.

८ ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजता ही घटना उघडकीस आली होती. मूळ भोपाळजवळील कोलुआ खुर्दचा असलेला योगेंद्र दोन महिन्यांपूर्वीच शहरात कामाच्या शोधात आला होता. हमाल म्हणून काम करणारा योगेंद्र रेल्वे स्टेशनबाहेरही कामासाठी बोलवल्यावर जात होता. रेल्वे स्थानकावरच मिळेल ते खाऊन तेथेच झोपत होता. बुधवारी रात्री गेवराई ब्रुकबाँड येथून ट्रकमध्ये सिमेंट भरून देवळाईतील खडी रोडवर उतरवले होते. त्यानंतर दोन मित्रांसह दारू पिऊन रेल्वे स्थानकावर झोपण्यासाठी गेला. ९ ऑगस्ट रोजी डोक्यात वार करून त्याची हत्या केल्याचे उघडकीस आले.

सबळ पुराव्यानिशी मध्य प्रदेश गाठलेरेल्वे स्थानकात सध्या विकासकामे सुरू असल्याने अनेक सीसीटीव्ही बंद आहेत. त्यामुळे फुटेज नसल्याने आरोपीला शोधणे लोहमार्ग पोलिसांसमोर आव्हान होते. अधीक्षक स्वामी भोर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक शरद जोगदंड, सहायक निरीक्षक गणेश दळवी, उपनिरीक्षक प्रशांत गंभीरराव, चंदन साकला, प्रीत फड यांनी शोध सुरू केला. रेल्वे स्थानकावरील अन्य हमालांची चौकशी केली. खून केल्यानंतर अनिल पळून गेल्याचे निष्पन्न हाेताच पथकाने त्याच्या हर्सुद खलवा गावात जाऊन मुसक्या आवळल्या. अंमलदार संजय भेंडेकर, राहुल गायकवाड, प्रमोद जाधव, अनिल वाघमारे, प्रवीण धाडवे यांनी कारवाई पार पाडली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद