शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
3
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
4
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
5
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
6
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
7
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
8
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
9
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
10
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
11
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
12
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
13
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
14
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
15
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
16
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
17
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
18
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
19
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा

‘रोख नको, ऑनलाइन पाठव’ म्हणणाऱ्या लिपिकाला ‘फोन पे’वर लाच घेताच अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 19:42 IST

मृत होमगार्डच्या उपचारांचे बिल देण्यासाठी लावला होता पैशांचा तगादा

छत्रपती संभाजीनगर : तीन वर्षांपूर्वी उपचारादरम्यान निधन झालेल्या होमगार्डच्या रुग्णालयाचे बिल व सानुग्रह अनुदानाची २ लाख ९७ हजार रुपये मंजूर करण्यासाठी २० हजारांची लाच मागणारा होमगार्ड कार्यालयाचा मुख्य लिपिक सोपान पंडित टेपले (४१, रा. मयूर पार्क) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने गुरुवारी दुपारी अटक केली. तक्रारदाराकडून त्याने ऑनलाइन फोन पेवर लाच स्वीकारली, हे विशेष.

२४ वर्षीय तरुणीचे ४९ वर्षीय वडील छत्रपती संभाजीनगर विभागात होमगार्ड म्हणून कार्यरत होते. २०२३ मध्ये आजारामुळे रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. नियमाप्रमाणे मुलीने वडिलांच्या उपचारांचे बिल व सानुग्रह अनुदान मिळण्यासाठी एन-१२ येथील जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालयात अर्ज केला होता. मात्र, लाचखोर टेपलेने तिचा अर्ज अडवून ठेवला. उपचारांचे बिल व अन्य रक्कम मंजूर करण्यासाठी २० हजारांची लाच मागितली. वारंवार विनंती करूनही टेपलेने पैशांची मागणी कायम ठेवली. त्यामुळे संतप्त तरुणीने थेट याप्रकरणी एसीबी अधीक्षक माधुरी कांगणे यांच्याकडे तक्रार केली. कांगणे यांच्या आदेशावरून निरीक्षक राजू नांगलोत, संतोष तिगोटे यांनी तक्रारीची खातरजमा केली.

रोख नको, ऑनलाइन पाठवतपासात टेपले लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. पथकाच्या सूचनेवरून तरुणीने पुन्हा टेपलेला संपर्क साधला. टेपलेने तडजोडीअंती १५ हजारांची मागणी केली. मात्र, रोखऐवजी ऑनलाइन पैसे पाठवण्यास सांगितले. गुरुवारी तरुणीने त्याला १५ हजार रुपये ‘फोन पे’वर पाठवले. त्यावेळी नांगलोत, तिगोटे यांच्यासह अंमलदार राजेंद्र सिनकर, साईनाथ तोडकर, एन बागूल हे कार्यालयाबाहेरच दबा धरून बसलेले होते. टेपलेने तरुणीला पैसे प्राप्त झाल्याचे सांगताच पथकाने कार्यालयात जात त्याला ताब्यात घेतले. त्याच्यावर सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर