छत्रपती संभाजीनगर : नव्या ‘स्मार्ट टीओडी (टाइम ऑफ डे)’ वीजमीटरमुळेवीजबिल अधिक येत असल्यासंदर्भात नागरिकांमध्ये असलेली शंका दूर करण्यासाठी महावितरणने आता थेट लोकप्रतिनिधींचा सहभाग घेण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत खासदार, आमदार आणि नगरसेवक यांच्याकडे जाऊन टीओडी मीटरची माहिती देण्यात येणार आहे. त्याबरोबरच जुन्या मीटरच्या बाजूलाच नवे मीटर बसवून पडताळणी करण्याची संधीही काही ग्राहकांना दिली जाणार आहे. यातूनच मीटरविषयी ‘दूध का दूध और पानी का पानी’ होण्यास मदत होईल.
महावितरणच्या अधिकारी - कर्मचाऱ्यांकडे नवे मीटर बसवण्यास प्राधान्य...महावितरणकडून सध्या नवीन वीज मीटर बसविण्यात येत आहेत. परंतु हे मीटर बसविल्यानंतर वाढीव बिल येत असल्याच्या तक्रारी अनेकांकडून येत आहेत. अनेक भागांमध्ये हे मीटर बसविण्यासाठी नागरिकांकडून विरोधही होत आहे. त्यामुळे मीटरविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठी महावितरणने कंबर कसली आहे. हा गैरसमज दूर होण्यासाठी महावितरणचे अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या घरी मीटर बसविण्याच्या कामास गती दिली आहे.
जुन्या मीटरमध्ये छेडछाड नसावीजुन्या मीटरच्या शेजारी नवीन मीटर बसवून पडताळणी करता येईल. अशी पडताळणी करण्यासाठी जुने मीटर योग्य स्थितीतील हवे. त्यात पूर्वी कोणतीही छेडछाड केलेली नसावी.
किती बसले स्मार्ट मीटर?छत्रपती संभाजीनगर परिमंडळात आजपर्यंत ३ लाख ७७ हजार ५६८ ग्राहकांडे स्मार्ट टीओडी मीटर बसवण्यात आले आहेत. त्यात छत्रपती संभाजीनगर शहर मंडळात १ लाख १ हजार ९९९, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण मंडळात १ लाख ८० हजार २६ , तर जालना मंडळात ९५ हजार ५४३ मीटर सर्व वर्गवारीतील ग्राहकांकडे बसवण्यात आले आहेत.
दोन्ही मीटरची रीडिंग पडताळणीस्मार्ट मीटरविषयी जनजागृती केली जात आहे. लोकप्रतिनिधींची भेट घेऊन त्यांच्याही शंका दूर करण्याची सूचना एजन्सीला केली आहे. काही भागांमध्ये नागरिकांनी मागणी केली तर त्यांच्या जुन्या मीटरच्या बाजूला नवीन स्मार्ट मीटर बसवून ३-४ दिवस दोन्ही मीटरची रीडिंग पडताळणी करता येईल. यासाठी जुने मीटर योग्य स्थितीत हवे. प्रत्येक ग्राहकासाठी असे करता येणार नाही. परंतु शंका असणाऱ्या भागांत असे करता येईल.- पवनकुमार कछोट, मुख्य अभियंता, महावितरण, छत्रपती संभाजीनगर परिमंडळ
Web Summary : MSEDCL addresses concerns about increased bills from smart meters by involving representatives. New meters will be installed alongside old ones for comparison, ensuring transparency. Over 3.7 lakh smart meters are already installed in Aurangabad region.
Web Summary : MSEDCL स्मार्ट मीटर के बिलों को लेकर चिंताओं को दूर करने के लिए प्रतिनिधियों को शामिल करेगा। तुलना के लिए पुराने मीटरों के साथ नए मीटर लगाए जाएंगे, जिससे पारदर्शिता सुनिश्चित होगी। औरंगाबाद क्षेत्र में 3.7 लाख से अधिक स्मार्ट मीटर पहले ही स्थापित किए जा चुके हैं।