शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
2
तमिळनाडूत थलपती सरकारचा पॉवरफुल निर्णय! मोफत विजेची मर्यादा थेट 'दुप्पट', सर्वसामान्यांचे बिल निम्म्यावर
3
Thalapathy Vijay : Video - 'डाऊन टू अर्थ' मुख्यमंत्री! शपथ होताच उचललं टेबल; विजय यांच्या साधेपणाने जिंकली लोकांची मनं
4
लग्नाचा हट्ट नडला! प्रियकराने भावोजीच्या मदतीने प्रेयसीचा काटा काढला; रेल्वे ट्रॅक शेजारी फेकला मृतदेह
5
CSK vs LSG : हाऊ इज द जोश! Josh Inglis चा धमाका! शतक हुकलं; पण वादळी खेळीसह साधला मोठा डाव
6
Video - अतूट बंध! तू एकटी नाहीस... कॅन्सरशी लढणाऱ्या पत्नीसाठी पतीनेही कापले स्वत:चे केस
7
किम जोंगच्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास थेट अणुबॉम्बच टाकणार, उत्तर कोरियाने घेतला मोठा निर्णय
8
Persian Gulf Tension: समुद्रात पुन्हा रक्ताची होळी? कतारच्या किनाऱ्याजवळ ब्रिटनच्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला
9
शेअर बाजारात 'या' ५ शेअर्सचा धुमाकूळ! पाचच दिवसांत दिला ४५ ते ८० टक्क्यांपर्यंत परतावा; बघा लिस्ट
10
हंटाव्हायरस बाधित जहाज अखेर स्पेनला पोहोचलं! ३ जणांचा बळी; प्रवाशांच्या सुटकेसाठी WHO कडून 'स्पेशल ऑपरेशन'
11
जे बंगालमध्ये घडलं नाही ते तामिळनाडूत घडलं, विजय यांनी भाजपाच्या हातून मोठा मुद्दा पळवला? शपथविधीवेळी घडलं असं काही...  
12
तामिळनाडूचे CM होताच जोसेफ विजय यांनी काढला १० लाख कोटींच्या कर्जाचा मुद्दा, स्टालीन भडकले! प्रकरण काय?
13
Video - आता हे काय नवीन? "आणखी अभ्यास केला असता तर..."; लेकाला ४९९/५०० गुण मिळूनही आई नाराज
14
Hanta Virus : "घाबरण्याची गरज नाही, परिस्थिती नियंत्रणात, पण..."; हंटा व्हायरसबाबत WHO चा मोलाचा सल्ला
15
बूट पळवण्याच्या खेळावरून इतका वाद झाला की, चिडलेल्या नवरीनं मांडवातूनच नवऱ्याला माघारी धाडला!
16
भोंदू खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांची चौकशी सुरू; नाशिकमध्ये SIT समोर नोंदवला जबाब
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटची पाकिस्तानसारखी अवस्था, करारावरून वाद, खेळाडू आणि बोर्ड आमने-सामने, ५ क्रिकेटपटूंनी घेतला असा निर्णय
18
परदेशातून भारतात आले ११.४ लाख कोटी रुपये, जगातील सर्वाधिक 'रेमिटन्स' मिळवणारा देश
19
ड्रायव्हर, नोकर अन् नातेवाईकांच्या नावे जमवलेली संपत्ती होणार जप्त; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
"आई-वडिलांना सोड तरच..."; हमाली करुन बायकोला शिकवलं, नोकरी मिळताच नवऱ्याला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

दहावीचा उच्चांकी निकाल..!

By admin | Updated: June 18, 2014 01:44 IST

उस्मानाबाद : विद्यार्थ्यांची भावी वाटचाल निश्चित करणाऱ्या दहावी परीक्षेचा निकाल मंगळवारी दुपारी १ वाजाता आॅनलाइन जाहीर.

उस्मानाबाद : विद्यार्थ्यांची भावी वाटचाल निश्चित करणाऱ्या दहावी परीक्षेचा निकाल मंगळवारी दुपारी १ वाजाता आॅनलाइन जाहीर. यंदाही मुलींनीच बाजी मारली असून जिल्ह्याचा टक्काही वधारला आहे. गतवर्षीचे तुलनेत जवळपास साडेसात टक्क्यांनी निकाल उंचावला आहे. एकूण निकाल ८४.७४ टक्के इतका लागला आहे. गुणवत्ता यादीमध्ये जिल्ह्यातील ३ हजार ७१३ विद्यार्थ्यांनी स्थान मिळविले आहे. तर प्रथम श्रेणी तब्बल ६ हजार ४३९ विद्यार्थ्यांनी प्राप्त केली आहे. जिल्ह्याचा आजवरचा हा सर्वात उच्चांकी निकाल असल्याचे सांगण्यात आले.
२४ शाळांनी गाठली शंभरी
नव्वद टक्क्यापेक्षा अधिक गुण घेणाऱ्या शाळांची संख्या जवळपास १०३ इतकी आहे. तर दुसरीकडे १०० टक्के निकाल लागलेल्या शाळांचा आकाडा २४ वर जावून ठेवला आहे. यामध्ये विद्यामाता माध्यमिक विद्यालय उस्मानाबाद, भैरवनाथ हायस्कूल धारूर, ग्रीनलॅन्ड हायस्कूल उस्मानाबाद, सीट प्राईड सेकंडरी हायस्कूल समतानगर उस्मानाबाद, पंडीत जवाहरलाल नेहरू उर्दू हायस्कूल भूम, श्री संत गोरोबाकाका विद्यालय सौंदणा (अंबा), लोमटे माध्यमिक विद्यालय भाटशिरपुरा, केंद्रीय माध्यमिक निवासी आश्रम शाळा डिकसळ, मदर टेरेसा माध्यमिक विद्यालय शेलगाव (द.), निवाशी अपंग शाळा सास्तूर, जय स्वामी नारायण विद्यालय समुद्राळ, द रायजिंग सण इंग्लिस स्कूल उमरगा, डॉ. शामप्रसाद मुखर्जी माध्यमिक विद्यालय कुंभेफळ, श्रीराम हायस्कुल पाचपिंपळा, जिल्हा परिषद हायस्कूल जळकोट, पार्वती कन्या प्रशाला जळकोट, इंदिरा गांधी विद्यालय गंधोरा, ज्ञानदिप विद्यालय सलगरा, मेसाई माध्यमिक विद्यालय जवळा (मे.), मोहमद मुनीर उर्दू माध्यमिक शाळा हांगरगा, कमळेशवर विद्यालय पिंपळगाव (के.) या शाळांचा समावेश आहे.
मराठी निकालाचा चढता आलेख
मराठी विषयाचा निकाल वर्षागणिक उंचावत आहे. २०१२ मध्ये झालेल्या परीक्षेत या विषयाचा निकाल ८९.६७ टक्के इतका लागला होता. त्यानंतर २०१३ मध्ये झालेल्या परीक्षेत हा टक्का आणखी उंचावला. तो ९०.२० टक्क्यांवर जावून ठेपला. विशेष मार्च २०१४ मध्ये झालेल्या परीक्षेत निकालाचा आलेख उंचावलेला राहिला आहे. यंदा या विषयाचा निकाल ९२.८८ टक्के इतका लागला आहे. त्याचबरोबर हिंदी ८२.९२, इंग्रजी ९७.३३, उर्दू ९२.२९, गणित ८२.९४, विज्ञान ८६.७५ तर समाजशास्त्र या विषयाचा निकाल ९४.१२ टक्के इतका लागला आहे.
२७७० विद्यार्थी नव्वद टक्क्यांवर
नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या २ हजार ७७० इतकी आहे. त्यानंतर ८५ ते ९० टक्क्यांदरम्यान ३ हजार ३५४, ८० ते ८५ टक्क्यांदरम्यान ४ हजार ७२१, ७५ ते ८० टक्क्यादरम्यान पाच हजार ९९७, ७० ते ७५ दरम्यान सात हजार ४७३, ६५ ते ७० दरम्यान ८ हजार ५६४, ६० ते ६५ दरम्यान १० हजार ६६५, ४५ ते ६० दरम्यान २६ हजार १८६ तर ६ हजार ६९८ विद्यार्थ्यांना ४५ टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळाले आहेत.
रिपीटर : ९.९८ %
फ्रेश विद्यार्थ्यांचा निकाल उंचावला असला तरी यंदा रिपटर विद्यार्थ्यांचा निकाल कमी लागला आहे. गतवर्षी रिपीटरचा २१.६ टक्के इतका निकाल लागला होता. मात्र, यंदा ९.९८ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. परीक्षेसाठी २ हजार ९०४ जणांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २ हजार ८९६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असता केवळ २८९ विद्यार्थीच उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये १८८ मुले तर १०१ मुलींचा समावेश आहे. मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ८.७३ तर मुलींचे प्रमाण १३.५९ टक्के इतके आहे. नांदेडचा १३.९८ तर लातूरचा निकाल १४.५ टक्के इतका लागला आहे.
भूम तालुक्याची परंपरा कायम !
दहावीच्या परीक्षेत यंदाही भूम तालुक्याने आपला दबदबा कायम राखल आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ६.८६ टक्क्यांनी निकालात वाढ झाली आहे. यंदा ९१.११ टक्के इतका निकाल लागला आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या स्थानावर परंडा तालुका आहे. प् त्याचप्रमाणे उस्मानाबाद ८६.२१, कळंब ८२.१०, लोहारा ८२.२८, उमरगा ८४.९६, परंडा ८६.९३, तुळजापूर ८१.८१ आणि वाशी तालुक्याचा ८३.२५ टक्के इतका लागला आहे. मागील तीन वर्षापासून सातत्याने भूमचे वर्चस्व कायम आहे.
कॉपीमुक्त अभियानाच्या प्रभारी अंमलबजावणीमध्ये परीक्षेतील गैरप्रकाराला आळा असला आहे. या अभियानामुळे पहिल्या वर्षी निकाल घसरला होता. मात्र, त्यानंतर मागील तीन वर्षांपासून सातत्याने निकालाध्ये वाढ होताना दिसून येत आहे. गतवर्षी जिल्ह्याचा निकाल ७७.४८ टक्के इतका होता. विशेष म्हणजे तेव्हाही ५.१८ टक्क्यांनी निकाल उंचावला होता. मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ७५.२१ तर मुलींचे ८०.१८ टक्के इतके होते. गतवर्षीप्रामणेच यंदाही परीक्षेत मुलींनीच बाजी मारली आहे. मार्च २०१४ मध्ये झालेल्या परीक्षेसाठी जिल्हाभरातील २० हजार ८२५ जणांनी (रिवाईज्ड कोर्स) नोंदणी केली होती. प्रत्यक्ष परीक्षेला २० हजार ७१५ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १७ हजार ५३३ विद्यार्थ्यांर्थी उत्तीर्ण झाले आहेत.
यामध्ये ११ हजार २८६ पैकी ९ हजार २५६ मुले तर ९ हजार ४२९ पैकी ८ हजार २९७ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. ८७.९९ मुलींचे तर ८२.०१ टक्के मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण आहे. जिल्ह्याचा एकूण निकाल ८४.७४ टक्के इतका लागला आहे. गतवर्षीप्रमाणेच यंदाही लातूर विभागात उस्मानाबादने आपले द्वितीय स्थान कायम ठेवले आहे. नांदेड तिसऱ्या स्थानावर फेकेले गेले आहे.
दरम्यान, नांदेडचा ७४.२९ तर लातूरचा ८७.१४ टक्के इतका निकाल लागला आहे. विभागाचा निकाल ८१.६८ टक्के इतका लागला आहे. (प्रतिनिधी)
संघर्षातून शोधला यशाचा मार्ग....
बाळासाहेब स्वामी ल्ल ईट
व्यवसायात कर्ज झाले, त्यामुळे सावकारापासून मुक्ती मिळविण्यासाठी तसेच दोन वेळच्या पोटाची खळगी भरण्यासाठी आई-वडील बाहेरगावी गेले. त्यामुळे चुलत्याकडे राहुन कसलहीे शिकवणी न लावता जि.प. प्रशाला ईट येथील काजल तुळशीराम शिंदे या विद्यार्थीनीने ८४.४० टक्के गुण मिळविले आहेत. काजलला अभियंता व्हायचे असून, परिस्थितीवर मात करुन मी त्यात यशस्वी होईन असा विश्वास तिने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.
माझ्या वडिलांचे ईट येथे बसस्थानक चौकात हॉटेल होते. या व्यवसायात त्याच्यावर कर्जाचा डोंगर वाढत गेला. पैशासाठी सावकार तगादा लावत असल्याने चौदा वर्षापूर्वी पोटाची खळगी भरण्यासाठी बाहेरगावी जाणे पसंत केले. त्यानंतर काजल हिचे संगोपन व्यवसायाने स्वयंपाकी असलेले तिचे चुलते शिवाजी तुळशीराम शिंदे यांनी केले. आजपर्यंतच्या शिक्षणात कोठेही खाजगी शिकवणी लावली नाही. शिक्षणाबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमातही हिरीरीने सहभाग घेत आज हे यश मिळाल्याचे तिच्या चुलत्याने आनंदाने सांगितले.
कुटुंबाला हातभार लावायचा
ईट येथीलच कै. विनायकराव देशमुख विद्यालयातील आसमा मुनेर काझी ही विद्यार्थीनीेही विशेष प्राविण्यात उत्तीर्ण झाली आहे. वडील बाराही महिने मोलमजुरी करतात. अत्यंत गरीब कुटुंब, वडीलांना कोरडवाहू अडीच एकर जमीन, आई-वडील, लहान दोन बहिणी असे एकूण पाच माणसाचे कुटुंब आहे. घरात वडील एकटेच काम करणारे असल्याने बाराही महिने मोलमजुरी करावी लागते. मात्र परिस्थितीशी दोन हात करीत, आसमाने ८६.४० टक्के गुण मिळविले आहेत. विशेष म्हणजे गणित विषयात तिला १०० पैकी ९९ गुण मिळाले आहेत. कसलीही खाजगी शिकवणी न लावता शाळेतील वर्ग, जादा तास व नियमित अभ्यासाच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आसमा काझी हिने हे यश मिळविले आहे. मला भाऊ नाही, आम्हा तिन्ही बहिणींना शिकविण्यासाठी खूप खर्च होणार आहे. त्यामुळे शिक्षक होवून कुटूंबाला हातभार लावणार असल्याचे तीने सांगितले.
परिस्थितीशी झुंजून गाठले यशोशिखर !
बालाजी बिराजदार ल्ल लोहारा
आर्थिक परिस्थिती हलाखीची असताना त्यावर मात करुन लोहाऱ्यातील अनेक विद्यार्थ्यांनी कौतुकास्पद यश मिळविले आहे. मंगळवारी दहावी परिक्षेचा निकाल लागल्यानंतर या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. लेकरांनी कष्टाचे चिज केले अशीच भावना हे पालक व्यक्त करीत होते.
लोहारा हायस्कूलमधील स्नेहा उमाकांत मठपती विद्यार्थिनीने दहावीमध्ये ९६ टक्के गुण घेतले आहेत. स्रेहाच्या घरची परिस्थिती प्रचंड हलाकीची, आई-वडील दोघेही मोलमजुरी करतात. त्यामुळे खाजगी क्लासेसही नव्हते. मात्र आयुष्यात काहीतरी व्हायचे या भावनेने ती अभ्यासाला लागली. पालकांनीही आपण भोगली ती परिस्थिती आपल्या मुलीवर येवू नये म्हणून मुलीला चांगलं शिक्षण देण्यासाठी जमेल तसे पैसे दिले. आई-वडिल काबाडकष्ट करुन शिक्षण करताहेत ही जाणीव कायम मनात होती. त्यामुळेच मी अभ्यासात लक्ष घातले. यात मला यश आले. कष्ट केले की यश हमखास मिळते, असे स्नेहाने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
चुलत्याकडे राहून केला अभ्यास
लोहारा : तालुक्यातील लोहारा (खुर्द) येथील नितीन पाटील या विद्यार्थ्यानेही अशीच परिस्थितीशी झुंज देत ८१.४० टक्के गुण मिळविले आहेत. नितीन हा नळदुर्ग येथील हुतात्मा बाबूराव बोरगावकर माध्यमिक विद्यालयात शिकतो. नितीन चौथीला असताना आईचे छत्र हरवले. त्यात पोटापाण्यासाठी वडील पुण्याला असल्याने चुलते शेखर पाटील यांनी त्याचा सांभाळ करुन त्याला चांगले शिक्षण देण्याचे ठरविले. त्यात शेखर पाटील यांनी आपल्या बंधुकडे नळदुर्ग येथे शिक्षणासाठी ठेवले आहे. परिस्थितीचा सामना करीत नितीन शिक्षण घेत राहिला. एखादी गोष्ट जर मनावर घेवून मनापासून केली तर त्यात यश मिळते तेच मी केले. आणि यापुढेही करणार असल्याचे नितीनने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. शहरातील शेख फरीद सय्यदपाशा पटवारी याचीही अशी संघर्षमय कहानी आहे. या विद्यार्थ्याने दहावी परीक्षेत ९४.६० टक्के गुण घेतले आहेत. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची, वडील रेडिओ मेकॅनिक, मुलांना शिक्षण मिळावे म्हणून आई लातूर येथे खाजगी प्रेसमध्ये नोकरी करते. या परिस्थितीची जाणीव ठेवून फरीदने अभ्यास केला. आज त्याच्या कष्टाला फळ मिळाले. या यशाने त्याच्या पालकांना झालेला आनंद मोठा होता.
शाळेसाठी तीन किलोमीटरची पायपीट
मुकूंद चेडे ल्ल वाशी
जवळका येथील सुरज सुरेश नाळपे हा लोकमान्य विद्यालय तांदुळवाडी येथून शालान्त प्रमाणपत्र परीक्षेत ८७.२० टक्के मार्क घेऊन उत्तिर्ण झाला. आहे. दोन एकर शेती असली तरी ती कोरडवाहू त्यामळे घरची परिस्थिती हलाखीची... शाळेसाठीही दररोज तिन ते चार किलोमिटरची पायपीट मात्र या सर्व परिस्थितीवर मात करीत सुरेशने हे यश मिळविले आहेत. अत्यल्प शेतीमुळे सुरेशच्या वडीलांना मोलमजुरी करावी लागते. हलाखीच्या परिस्थितीमुळे ना शिकवणी, ना इतर कुठली सुविधा मात्र सुरेशने निराश न होता. अभ्यासावर लक्ष केंद्रीत केले. वर्षभर घेतलेल्या या कष्टाचे अखेर चीज झाले. या यशामुळे त्याच्या घरच्याचा आनंदही ओसंडून वाहत होता. पोराने केलेल्या कष्टाचे आज फळ मिळाले अशी प्रतिक्रिया त्याच्या वडीलांनी व्यक्त केली. विद्यालयाचे मुख्याध्यापक नानासाहेब चौधरी यांनीही त्याचे विशेष कौतुक केले. शहरी भागातील विद्यार्थ्याच्या मागे नसल्याचेच सुरेशने दाखवून दिले.