शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
3
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
4
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
5
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
6
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
7
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
8
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
9
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
10
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
11
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
12
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
13
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
14
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
15
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
16
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
17
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
18
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
19
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
20
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!

आक्षेपार्ह वक्तव्यावरून हर्षनगरात दोन गटांत राडा; रात्रीतून दंगा काबू पथक तैनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 12:45 IST

अल्पवयीन मुलांचा समावेश, लाठ्याकाठ्यांनी हल्ला, पाच जखमी

छत्रपती संभाजीनगर : रस्त्यावरून पायी जाणाऱ्या दोन युवकांना पाहून आक्षेपार्ह वक्तव्य केल्यावरून युवकांच्या दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. शुक्रवारी रात्री आठ वाजता घडलेल्या घटनेत पाचजण जखमी झाले. या घटनेनंतर परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षनगर भागात दोन युवक पायी चालले होते. चौकात उभ्या काही युवकांनी या दोघांना उद्देशून खोडसाळपणे आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यातून त्यांच्यात वाद उफाळून आले. काही क्षणांतच दुसऱ्या गटातील तरुण चौकात दाखल झाले. दोन्ही गट आमनेसामने आले. लाठ्याकाठ्या, दगडांनी एकमेकांवर हल्ला चढवला. दोन्ही गटांतील पाचजण जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच सिटी चौक ठाण्याच्या पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी, दिलीप चंदन, उपनिरीक्षक भागवत मुठाळ, अजित दगडखैर यांच्यासह मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी जमावाला पांगवत जखमींना रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर सहायक आयुक्त संपत शिंदे, विशेष शाखेचे अविनाश आघाव, गुन्हे शाखेचे संभाजी पवार हेदेखील आले.

पोलिसांचे शांततेचे आवाहननिरीक्षक निर्मला परदेशी यांनी दोन्ही बाजूंच्या ज्येष्ठ नागरिकांशी संपर्क साधून युवकांना समजावून सांगण्याची सूचना केली. शिवाय, शांततेचे आवाहन केले. रात्री उशिरा दोन्ही गटांच्या परस्परविरोधी तक्रारींवरून गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. यात बहुतांश युवक अल्पवयीन असल्याचे पोलिसांनी सांगितले. परिसरात दंगा काबू पथकासह पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर