शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

जाधवमंडीतील जुगार अड्ड्यावर सिटीचौक पोलिसांची धाड, ३० जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 18:59 IST

जाधवमंडी येथे बिनधास्तपणे सुरू होता जुगार

ठळक मुद्देजुगारी बहुतेक व्यापारी

औरंगाबाद: गणेशोत्सवाच्या बंदोबस्तासाठी जागोजागी पोलीस अधिकारी कर्मचारी तैनात आहे, शिवाय त्यांनी गस्त वाढविली असतानाही जाधवमंडी येथे बिनधास्तपणे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सिटीचौक पोलिसांनी बुधवारी रात्री धाड टाकून जुगार अड्डा चालविणाऱ्यासह ३० जणांना अटक केली. आरोपींकडून रोख १२ हजार ९०० रुपये आणि ७३ हजार रुपये किंमतीचे मोबाईल, जुगाराचे साहित्य हस्तगत केले.

सिटीचौक ठाण्याचे निरीक्षक संभाजी पवार यांनी सांगितले की, पोलीस उपनिरीक्षक पाथरकर ,पोहेकाँ अप्पासाहेब मनगटे आणि अन्य कर्मचारी हे बुधवारी रात्री शहागंजमधील सिटीचौक भागात नाकाबंदी करीत असताना त्यांना माहिती मिळाली की,  जाधवमंडी येथील बांबूगल्लीत जुगार सुरू आहे. यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली दोन पंचाना सोबत घेऊन रात्री दिड ते पावणे दोन वाजेच्या सुमारास अर्धे शटर वर असलेल्या गाळ्यामध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकली. यावेळी तेथे ३० जण पत्त्यावर तिर्रट नावाचा जुगार खेळत असल्याचे दिसले.  जुगार खेळणाऱ्यांसमोर रोख रक्कम आणि पत्ते पडलेले दिसले. पोलिसांना पाहून काही जण पळून जाण्याचा प्रयत्न करीत होते.

मात्र पोलिसांनी त्यांना जागेवरून न हालण्याचे आदेश दिले. यानंतर प्रत्येक ाची झडती घेतली असता प्रत्येकांकडे रोख रक्क म आणि तर काही जणांकडे मोबाईल आणि रोख रक्कमही आढळली. हा जुगारअड्डा आरोपी रेवन मिनीनाथ सोनवणे (वय ३४,रा. जाधवमंडी) हा चालवित असल्याचे समजले. आरोपी रेवण हा प्रत्येक खेळामागे विशिष्ट रक्कम घ्यायचा अशी माहिती अन्य जुगाऱ्यांनी यावेळी पोलिसांना दिली. यावेळी सर्व जुगाऱ्यांकडून एकूण १२ हजार ९००रुपये आणि ७३ हजार रुपये किंमतीचे १९ मोबाईल हॅण्डसेट जप्त केले.

जुगारी बहुतेक व्यापारी जाधवमंडी येथे जुगार खेळणारे बहुतेक आरोपी हे परिसरातील लहानमोठे व्यापारी असल्याचे पोलीस चौकशीत समोर आले. शिवाय जुगारअड्डा चालविणाराही व्यापारीच असून तो जाधवमंडीतील रहिवासी आहे. आरोपी रेवणविरोधात जुगार अड्डा चालवित असल्या गुन्हा तर अन्य २९ लोकांविरोधात पैशावर जुगार खेळत असल्याची फिर्याद पोलीस हवालदार मनगटे यांनी नोदविली. सिटीचौक पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटकAurangabadऔरंगाबादPoliceपोलिसcity chowkसिटी चौक