शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

शहर पाणीपुरवठ्याची सूत्रे आता सुनील केंद्रेकरांकडे; कामचुकारांना गुन्हे नोंदवण्याचा दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2022 19:06 IST

काम केले नाही तर गुन्हे नोंदवण्याचा इशारा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिला आहे

औरंगाबाद: शहरातील पाणीपुरवठ्याची सूत्रे शासनाने विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या हाती सोपविली आहेत. विभागीय आयुक्तांनी उपाययोजनेच्या अनुषंगाने हर्सूल, नक्षत्रवाडी एमबीआर, नवीन योजनेतील जलवाहिनी उत्पादन, फारोळा जलशुद्धिकरण प्रकल्पातील अडचणी शुक्रवारी समजून घेत महत्त्वाच्या सूचना केल्या.

सूचनेप्रमाणे येत्या काही दिवसांत निर्णय झाले नाहीतर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत अभियंत्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा आयुक्त केंद्रेकर यांनी नक्षत्रवाडी एमबीआर बैठकीत दिला. एमजेपीचे अभियंता अभयसिंह, मनपाचे अभियंता किरण धांडे, पंडित, हेमंत कोल्हे, समीर जोशी आदींची यावेळी उपस्थिती होती.

चार दिवसाआड पाणीपुरवठा व्हावा, यासाठी पूर्ण क्षमतेने प्रयत्न सुरू आहेत. २४ एप्रिलपासून शासनाच्या आदेशाने केंद्रेकर यांनी पाणीपुरवठा वाढण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून एमआयडीसी, हर्सूल तलावातील पाणी पूर्ण क्षमतेने मिळाल्यास चार दिवसाआड शहराला पाणी देणे शक्य होणार आहे. जुनी जलवाहिनी, गळत्या, उपसा पंप, एमबीआरची साठवण क्षमता याचा आढावा घेतल्यानंतर अनेक त्रुटी आयुक्तांच्या समोर आल्या.

मनाला येईल तशा नियोजनामुळे बट्ट्याबोळमनला वाटेल तसे जलवाहिनीचे जाळे वाढवित गेल्यामुळे पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सिडको-हडकोचे पाणी हर्सूलपर्यंत जात आहे, मग या भागांना पाणी कुठून मिळणार. जुन्या शहरातील पाणी सोयीनुसार वळविल्यामुळे शहागंज व परिसरात पाणी जात नसल्याचे बैठकीत समोर आले. त्यावर हर्सूल तलावातील पाणी वापरण्याचा निर्णय झाला आहे. एमबीआर (साठवण जलकुंभ) येथील तांत्रिक बदलाच्या सूचना आयुक्तांनी केल्या तसेच १५० एचपीचा पंप बसविणे, नवीन एमबीआरची उंची वाढविणे, हर्सूल तलावातील दोन्ही शुध्दिकरण केंद्र चालू केल्यानंतर पाणीपुरवठ्यात मोठा बदल अपेक्षित असल्याचे आयुक्त म्हणाले.

हर्सूल जलवाहिनीत हंडे व गाळशहरात पाणीटंचाई असतांना हर्सूल तलावातील जलउपसा वाहिन्यांकडे दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास आले. त्यात रांजण, हंडे व इतर गाळ अडकून पडल्यामुळे १२ ऐवजी फक्त ३ एमएलडी पाणी जात होते. जलवाहिनी स्वच्छ केल्यामुळे आता ६ एमएलडी पाणी वाढले आहे. दुर्लक्षामुळे शुद्धिकरण बंद पडले होते. ते सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. एमआयडीसी, हर्सूल, नहर-ए-अंबरी आणि जायकवाडी असे चार स्त्रोत असतानाही पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने केंद्रेकर यांनी यंत्रणेची खरडपट्टी केली.

टॅग्स :Divisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालयAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका