शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
2
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
3
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
4
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
5
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
6
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
7
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
9
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
10
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
11
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
12
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
14
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
15
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
16
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
17
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
18
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
19
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
20
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते

शहर पोलीस अ, मसिआ विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 12:46 AM

एमजीएम क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या २८ व्या शहीद भगतसिंग औद्योगिक क्रिकेट स्पर्धेत उच्च न्यायालय वकील संघाने इन्स्टिट्यूट आॅफ आर्किटेक्ट संघावर २ गडी राखून मात केली. अन्य लढतीत शहर पोलीस अ संघाने बजाज आॅटोवर आणि मसिआने युनायटेड ब्रेवरीजवर विजय मिळवला. शनिवारी झालेल्या लढतीत मधुर पटेल, संजय पाटील आणि मनोज शिंदे सामनावीर किताबाचे मानकरी ठरले.

ठळक मुद्देऔद्योगिक क्रिकेट स्पर्धा : मधुर पटेल, संजय पाटील, मनोज शिंदे सामनावीर

औरंगाबाद : एमजीएम क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या २८ व्या शहीद भगतसिंग औद्योगिक क्रिकेट स्पर्धेत उच्च न्यायालय वकील संघाने इन्स्टिट्यूट आॅफ आर्किटेक्ट संघावर २ गडी राखून मात केली. अन्य लढतीत शहर पोलीस अ संघाने बजाज आॅटोवर आणि मसिआने युनायटेड ब्रेवरीजवर विजय मिळवला. शनिवारी झालेल्या लढतीत मधुर पटेल, संजय पाटील आणि मनोज शिंदे सामनावीर किताबाचे मानकरी ठरले.आज झालेल्या पहिल्या सामन्यात इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ आर्किटेक्टने २0 षटकांत सर्वबाद १३१ धावा केल्या. त्यांच्याकडून शुभम हरकळने २३ चेंडूंत ४ चौकार, २ षटकारांसह ३७, अमोल पवारने २९ चेंडूंत ३ चौकारांसह ३0 धावा केल्या. उच्च न्यायालय संघाकडून संदीप सहानी, सचिन जैस्वाल यांनी प्रत्येकी २ तर मनोज शिंदेने १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात उच्च न्यायालय वकील संघाने विजयी लक्ष्य १९.३ षटकांत ८ गड्यांच्या मोबदल्यात गाठले. त्यांच्याकडून मनोज शिंदेने २७ चेंडूंत ४ चौकार व एका षटकारासह ३५ तर संदीप सहानी याने १९ चेंडूंत ३ चौकारांसह २१ धावांचे योगदान दिले. इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ आर्किटेकतर्फे सुनील भालेने १0 धावांत ३ व अमोल खरातने २ गडी बाद केले.दुसऱ्या सामन्यात बजाज आॅटोचा संघ ६२ धावांत सर्वबाद झाला. त्यांच्याकडून धर्मेंद्र मावी याने १४ व अली बाकोदाने ११ धावा केल्या. शहर पोलिसकडून शेख जिलानीने ११ धावांत ३, मोहमद इम्रान, आनंद गायके व संजय पाटील यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात शहर पोलिसने विजयी लक्ष्य ९ षटकात ४ गडी गमावून गाठले. त्यांच्याकडून शेख मुकीमने ३ चौकार व २ षटकारासह २८ व संजय पाटीलने ९ चेंडूंत २ चौकारांसह नाबाद १२ धावा केल्या. बजाज आॅटोकडून धर्मेंद्र महावीरने ८ धावांत ४ गडी बाद केले.तिसºया सामन्यात ब्रेवरीजने ६ बाद १४५ धावा केल्या. त्यांच्याकडून पंकज फलकेने ४४ चेंडूंत ८ चौकारांसह ४, संदीप नागरेने २७, भास्कर जिवरगने २२ व स्वरूप बॅनर्जीने २१ धावा केल्या. मसिआकडून अतिक नाईकवाडेने २ तर मधुर पटेल, रोहन राठोड, केतन गोडबोले यांनी प्रत्येकी १ गडी बाद केले. प्रत्युत्तरात मसिआने विजयी लक्ष्य ४ गडी गमावून गाठले. त्यांच्याकडून मधुर पटेलने ५८ चेंडूंत ९ चौकार व २ षटकारांसह नाबाद ८४ धावांची वादळी खेळी करीत निर्णायक कामगिरी केली. त्याने अतिक नाईकवाडेच्या साथीने नाबाद ५७ धावांची भागीदारीही केली. कर्णधार संदीप भंडारीने १४ धावांचे योगदान दिले. ब्रेवरीजकडून भास्कर जिवरग, संदीप गायकवाड यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. उद्या, रविवारी सकाळी ७.३0 वाजता एमजीएम वि. आयुर्विमा, सकाळी १0.३0 वा. बडवे इंजिनिअरिंग व एमआयटी रुग्णालय व १२ वाजता वैद्यकीय प्रतिनिधी व कंबाईन बँकर्स असे सामने खेळवले जाणार आहेत.