शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे अपघात: आमदाराने पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप, ३ दिवसांनंतर अजित पवार ॲक्शन मोडवर!
2
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
3
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
4
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध
5
Gold Price Today : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! सोन्याचे दर पुन्हा घसरले
6
महेंद्रसिंग धोनी आम्हाला कळवेल...! कॅप्टन कूलच्या निवृत्तीच्या चर्चांवर CSK ने दिले महत्त्वाचे अपडेट्स
7
PM मोदींच्या वक्तव्यानंतर सरकारी कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी, कोल इंडियाबाबत ब्रोकरेज बुलिश, म्हणाले...
8
दगडफेक अन् खुर्चीफेक, अखिलेश यादवांच्या सभेत उडाला गोंधळ; पोलिसांचा लाठीचार्ज, काय घडलं?
9
T20 WC 2024: "रिंकू एकमेव खेळाडू आहे जो...", 'भज्जी'ने टीम इंडियासाठी सांगितली रणनीती
10
Closing Bell: शेअर बाजाराचं मार्केट कॅप $५ ट्रिलियन पार; मेटल शेअर्समध्ये तेजी, बँक-आयटी घसरले
11
एका सेक्स वर्करमुळं २११ ग्राहकांची झोप उडाली; पोलीस करतायेत प्रत्येकाला कॉल
12
IPL Playoffs 2024 Qualifier 1 KKR vs SRH: आजचा सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होणार... जाणून घ्या नियम
13
हिंदी सोडा 'या' साऊथ अभिनेत्याकडे आहे कोट्यवधींची संपत्ती, बुर्ज खलिफामध्ये फ्लॅट अन्...
14
माझं काम न करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची यादी मी अजितदादांकडे दिली, पण...; श्रीरंग बारणेंचा आरोप
15
तुम्हाला तुमची चूक मान्य आहे का? कोर्टाच्या प्रश्नावर ब्रिजभूषण सिंह यांनी स्पष्टच सांगितले
16
सावधान! आरोग्यविषयक ‘या’ समस्या असलेल्या लोकांसाठी चहाचा एक घोट ठरू शकतो ‘विष’
17
Sunita Kejriwal : "अच्छे दिन येणार, मोदीजी जाणार; माझे पती जेलमध्ये जाऊ नयेत असं तुम्हाला वाटत असेल तर..."
18
धक्कादायक! मोबाईलनं घेतला २२ वर्षीय युवतीचा जीव; डॉक्टरांनी रहस्य उलगडलं, पोलीस हैराण
19
“कुणालाही पाठीशी घालू नका”; पुणे पोर्शे अपघात प्रकरणी CM एकनाथ शिंदेंचे पोलिसांना निर्देश
20
Fact Check : भाजपने भारतीय मेट्रोचा विकास म्हणत शेअर केला सिंगापूरचा फोटो

शहरी रुग्णालयांचीही भरती रखडलेलीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2017 12:23 AM

ग्रामीण भागाप्रमाणेच शहरी रुग्णालयेही रिक्त पदांमुळे अडचणीत आलेली आहेत. मात्र ती कमतरता दूर करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने एनआरएचएममधून काही पदे भरण्यासाठी प्रक्रिया हाती घेतली होती. मात्र ती अद्याप पूर्ण झाली नाही. त्यामुळे शहरी रुग्णालयांचेही तेच हाल आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : ग्रामीण भागाप्रमाणेच शहरी रुग्णालयेही रिक्त पदांमुळे अडचणीत आलेली आहेत. मात्र ती कमतरता दूर करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने एनआरएचएममधून काही पदे भरण्यासाठी प्रक्रिया हाती घेतली होती. मात्र ती अद्याप पूर्ण झाली नाही. त्यामुळे शहरी रुग्णालयांचेही तेच हाल आहेत.जिल्हा सामान्य रुग्णालयच वैद्यकीय अधिकाºयांची अनेक पदे रिक्त असल्याने सलाईनवर आहे. त्यातच स्त्रीरोग तज्ज्ञ नसल्याने अनेकदा बाहेरून डॉक्टर बोलावण्याची वेळ येते सिझेरियनसाठी तर नेमका याशिवाय पर्यायच नाही. त्यातच मध्यंतरी एनआरएचएमअंतर्गत कंत्राटी तत्त्वावर भरतीसाठी शासनाने मंजुरी दिल्यानंतर जाहिरातही काढण्यात आली होती. मात्र त्याची भरती काही अद्याप झाल्याचे दिसत नाही. यात आयुष वैद्यकीय अधिकारी, युनानी वैद्यकीय अधिकारी, महिला मसाजिस्ट, आरबीएसकेसाठी एक वैद्यकीय अधिकारी व एक औषध निर्माता, बालरुग्ण अतिदक्षता विभागात ३ परिचारिका, भारतीय आरोग्य मानांकित रुग्णालय अंतर्गत जिल्हा रुग्णालयात ४ स्त्रीरोग तज्ज्ञ, कळमनुरी व सेनगावात प्रत्येकी एक स्त्री रोग तज्ज्ञ भरायचा आहे. याशिवाय जिल्हा रुग्णालयात फिजिशियन, हृदयरोग तज्ज्ञ, कान, नाक, घसा तज्ज्ञ, दंतरोग तज्ज्ञ, सर्जन-१ व रेडिआॅलॉजिस्ट-२ पदे भरायची आहेत.ही पदे वेळेत भरली तर रुग्णांना या सुविधेचा लाभ होणार आहे. मात्र शासनाने मंजुरी दिल्यानंतरही त्यासाठीची प्रक्रिया काही गतिमान होत नाही. जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी प्रकल्प प्रेरणाकडे लक्ष दिल्याने त्यात डॉक्टरांची भरती करण्यात यश आले होते. शिवाय त्यांनी मध्यंतरी प्रयत्नपूर्वक काही जागा भरून घेतल्याने अनेक ठिकाणी आज तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध झाली आहे. या रिक्त जागा भरण्यासाठीही जिल्हा सामान्य रुग्णालयासह जिल्हाधिकाºयांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.