शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

शहरात दुचाकी चोरट्यांची धूम सुरूच

By admin | Updated: June 14, 2016 00:08 IST

औरंगाबाद : शहरात वाहन चोरट्यांची धूम जोरात सुरू आहे. वाहन चोऱ्या रोखण्यात पोलीस यंत्रणा कमी पडत असल्याने रोज वेगवेगळ्या भागांतून दुचाकी चोरीला

औरंगाबाद : शहरात वाहन चोरट्यांची धूम जोरात सुरू आहे. वाहन चोऱ्या रोखण्यात पोलीस यंत्रणा कमी पडत असल्याने रोज वेगवेगळ्या भागांतून दुचाकी चोरीला जाण्याच्या घटना घडत आहेत. दोन दिवसांत शहरातून १३ दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्या. याप्रकरणी संबंधित ठाण्यात गुन्हे नोंदविले आहेत. हडकोतील भारतमातानगर येथील जगन्नाथ निकम हे भाजीपाला खरेदी करण्यासाठी एन-११ येथे गेले असता चोरट्यांनी त्यांची दुचाकी (क्र.एमएच-२० सीजे ९०४८) चोरट्यांनी चोरून नेली. ८ जून रोजी सकाळी ही घटना घडली. याप्रकरणी सिडको ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्य एक घटना सिडकोतील हॉटेल पारू समोर घडली. दीपक ढोणे यांनी त्यांची दुचाकी (क्र.एमएच-२० एएच ४००९) नेहरू गार्डनसमोरील एका हॉटेलजवळ उभी केली होती. ही दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली. शहाबाजार येथील रहिवासी मोबीन खान यांनी त्यांची दुचाकी (क्र.एमएच-२० एएल ७६) चेलीपुरा येथील एका प्रार्थनास्थळाजवळ उभी करून ठेवली होती. ही दुचाकी ८ जून रोजी रात्री चोरट्यांनी चोरून नेली. गुलमंडी येथील रहिवासी कमलेश मोतीवाला यांची मोपेड (क्र.एमएच-२० बीपी २२३२) घरासमोरून चोरट्यांनी चोरून नेली. यावेळी अनिल बाबूराव पटेल यांची मोपेड (क्र.एमएच-२० सीपी ०९३२) सुपारी हनुमान मंदिर रोडवरील घरासमोरून चोरट्यांनी चोरून नेली. सिटीचौक ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. शेख सत्तार यांची दुचाकी चोरट्यांनी रहेमानिया कॉलनी येथून चोरून नेली. सत्तार यांचे भाऊ सय्यद अजमत यांनी दुचाकी (क्र.एमएच-२० बीडी ९३०७) घरासमोर लॉक करून ठेवली होती. सत्तार यांनी जिन्सी ठाण्यात तक्रार दाखल केली. मयूर वायचाळ यांनी त्यांची दुचाकी (क्र. एमएच-२० सीजी ४८८६) रेल्वेस्टेशन गेटसमोर उभी करून ठेवली होती. ही दुचाकी ९ जून रोजी चोरट्यांनी चोरून नेली. अन्य एका घटनेत चरण कांबळे यांची दुचाकी उस्मानपुरा भागातील एका विमा कंपनीच्या कार्यालयासमोरून चोरून नेली. ८ जून रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी उस्मानपुरा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिडको एन-४ येथील आदिवासी वसतिगृहासमोर उभी केलेली दुचाकी (क्र.एमएच-२० बीजे ५९२७) चोरट्यांनी चोरून नेली. कृष्णा वाघ या विद्यार्थ्याने याविषयी पुंडलिकनगर ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. छत्रपतीनगर येथील संजय बलांडे यांची दुचाकी चोरट्यांनी घरासमोरून चोरून नेली. बलांडे यांनी हर्सूल ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. हीनानगर येथील इम्रान अखलाख सय्यद यांची दुचाकी चोरट्यांनी पळविली.