शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

गॅस सिलिंडरसाठी अजूनही भर उन्हात नागरिकांच्या रांगा; ओटीपीचा तिढा, घरात चुलीचे ठाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 18:33 IST

अनेक कुटुंबांवर १५ ते २० दिवसांपासून चूल पेटवण्याची वेळ

छत्रपती संभाजीनगर : शहरात घरगुती गॅस सिलिंडर वितरणासाठी आता १०० टक्के 'ओटीपी' सक्तीचा करण्यात आला आहे. मात्र, या नव्या नियमामुळे आणि होम डिलिव्हरीमध्ये होणाऱ्या विलंबामुळे ग्राहकांची मोठी गैरसोय होत असून, गॅस एजन्सीबाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. गॅस सिलिंडर वेळेवर मिळत नसल्याने अनेक कुटुंबांवर गेल्या १५ ते २० दिवसांपासून चूल पेटविण्याची वेळ आली आहे.

एपीआय कॉर्नर येथील भवानी गॅस एजन्सीसमोर दुपारी १२ वाजेच्या रणरणत्या उन्हात गॅससाठी नागरिकांनी मोठी रांग लावली होती. सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शहरातील विविध गॅस एजन्सीबाहेर हे विदारक चित्र पाहायला मिळाले. या रांगेत महिला आणि पुरुषांसह लहान मुलांचाही समावेश होता. ज्या ग्राहकांनी अगोदरच गॅसचे ऑनलाइन बुकिंग केले होते, त्यांना रांगेत न उभे राहता थेट सिलिंडर मिळत होता. मात्र, इतरांना तासंतास ताटकळत उभे राहावे लागत होते. शहरातील इतर काही गॅस एजन्सीवर गर्दी नसली तरी, प्रमुख एजन्सीबाहेर मात्र ग्राहकांची मोठी झुंबड उडाल्याचे चित्र होते. एका एजन्सीने तर ग्राहकांसाठी उन्हात कूलरची व्यवस्था केली होती.

चुलीवर स्वयंपाकराजनगराहून आलेले दिलीप मोरे हे जवळपास एक ते दीड तास रांगेत उभे होते. मात्र, नंबर आल्यावर त्यांना १० एप्रिलला या, असे सांगण्यात आले. आपली व्यथा मांडताना ते म्हणाले, गेल्या १५ दिवसांपासून गॅस मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे सध्या आमच्या घरी चुलीवर स्वयंपाक सुरू असून, सिलिंडर मिळविण्यासाठी माझी धडपड सुरू आहे. मंगेश गॅस एजन्सीच्या बाहेर पिसादेवीवरून आलेल्या वृद्ध महिला जिजाबाई मगरे या गॅससाठी ताटकळत उभ्या होत्या. गॅस नसल्याने त्यांच्याही घरी गेल्या महिन्याभरापासून चुलीवरच स्वयंपाक सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

'ओटीपी'चा तिढाडिलिव्हरी करणारी मुले एका दिवसात ५० जणांनाही घरपोच सिलिंडर देऊ शकतात. परंतु, 'ओटीपी' सक्तीमुळे मोठ्या अडचणी येत आहेत. गॅस कनेक्शनला बहुतांश घरातील कर्त्या पुरुषांचे मोबाइल नंबर जोडलेले आहेत. हे पुरुष कामाच्या निमित्ताने घराबाहेर असतात आणि घरात केवळ वृद्ध किंवा महिला असतात. डिलिव्हरी बॉय घरी गेल्यावर वेळेवर ओटीपी न मिळाल्याने सिलिंडर देता येत नाही. परिणामी, नाइलाजाने अनेक ग्राहकांना थेट एजन्सीवर धाव घ्यावी लागत आहे.- मंगेश आसवार, पदाधिकारी, एलपीजी डिस्ट्रिब्युटर्स असोसिएशन

English
हिंदी सारांश
Web Title : Citizens queue for gas cylinders amidst OTP issues, revert to stoves.

Web Summary : Chhatrapati Sambhajinagar citizens face long queues for gas cylinders due to mandatory OTP and delivery delays. Many families are forced to cook on traditional stoves due to gas shortages and OTP verification problems, particularly affecting elderly and women.
टॅग्स :LPG Gas Crisisएलपीजी गॅस टंचाईchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर