शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना...
2
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
3
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
4
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
5
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
6
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
7
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
8
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
9
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
10
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
11
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
12
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
13
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
14
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
15
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
16
Vastu Shastra: प्रगतीचे मार्ग मोकळे करायचे आहेत? मग तुमच्या घरातील 'हे' वास्तू दोष त्वरित दूर करा!
17
पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार?
18
"माझ्यावर हसतोय?" कुर्ल्यात तरुणावर चाकूनं सपासप वार, भररस्त्यात घडलेल्या घटनेनं खळबळ!
19
पुतिन-ट्रम्प यांची फोनवर चर्चा; युरेनियम रशियाला देण्याची ऑफर अमेरिकेने नाकारली! इराणचं टेन्शन वाढलं
20
अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ प्राचीन मूर्ती, अमूल्य ठेव्याची एवढी आहे किंमत 
Daily Top 2Weekly Top 5

चिनी कलावंतांना भारतीय नृत्याची भुरळ

By admin | Updated: January 6, 2015 01:12 IST

औरंगाबाद : शहरातील नृत्य-गुरुकुल महागामीस बीजिंग डान्स अकॅडमीच्या शिष्टमंडळाने सोमवारी भेट दिली.

औरंगाबाद : शहरातील नृत्य-गुरुकुल महागामीस बीजिंग डान्स अकॅडमीच्या शिष्टमंडळाने सोमवारी भेट दिली. यावेळी भारतीय नृत्यसंगीत अन् ओडिसी, कथ्थक नृत्याच्या सादरीकरणाने चिनी कलावंतांना भुरळ पाडली. भारतीय नृत्यकलांचे सौंदर्य शिष्टमंडळातील कलावंतांना आकर्षित करून गेले.बीजिंग डान्स अकॅडमीचे आंतरराष्ट्रीय समन्वयक संचालक जँग पिंग, अकॅडमीच्या वरिष्ठ नृत्य शिक्षिका ज्यू ली आणि झँग जिंग यांनी महागामीस भेट दिली. आॅक्टोबरमध्ये चीन सरकारच्या सहकार्याने झालेल्या समारंभात महागामीसह जगभरातील २५ नृत्य अकादमींना निमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी महागामीच्या संघाने सादरीकरण केले होते. यानंतर भारतीय नृत्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी दोन्ही देशांतील नृत्यकला, संस्कृतीचे आदानप्रदान होण्याच्या दृष्टीने चीनमधील या पथकाने महागामीस भेट देण्याची इच्छा व्यक्त केली होती.त्यानुसार त्यांनी सोमवारी महागामीस भेट दिली. यावेळी महागामीच्या कलावंतांनी पारंपरिक भारतीय नृत्य कथ्थक, ओडिसी यांचे सादरीकरण केले. शिष्टमंडळाने पारंपरिक भारतीय नृत्यकलेतील बारकावे, सादरीकरण, साधना समजावून घेण्याचा प्रयत्न केला. पार्वती दत्ता यांनी त्यांना माहिती दिली.भारतीय संगीतावर चिनी नृत्यमहागामीच्या कलावंतांनी सादरीकरण केल्यानंतर शिष्टमंडळातील नृत्य शिक्षकांनीही चीनमधील पारंपरिक नृत्याचे सादरीकरण केले. हार्मोनियम आणि तबल्याच्या सूर-तालावर चिनी नृत्याचे सादरीकरण असा संगम यावेळी घडून आला. यावेळी जँग पिंग यांनी चीनमधील कला दाखविली.परंपरा जतन करण्याचा प्रयत्नचिनी पाहुण्यांनी भारतीय नृत्य परंपरा जोपासत त्यास संरक्षण देण्याचे कार्य करणाऱ्या महागामीच्या कार्याचे कौतुक केले. चीनमधील परंपरागत नृत्यकला अलीकडच्या काळात खंडित झाली आहे. बीजिंग डान्स अकॅडमीही अशा खंडित झालेल्या कला, नृत्य परंपरा जतन करण्याचा प्रयत्न करीत आहे.नृत्यमुद्रा... शहरातील नृत्य-गुरुकुल महागामीस बीजिंग डान्स अकॅडमीचे आंतरराष्ट्रीय समन्वय संचालक जँग पिंग, अकॅडमीच्या वरिष्ठ नृत्य शिक्षिका ज्यू ली आणि झँग जिंग यांनी सोमवारी भेट दिली. यावेळी महागामीच्या संचालिका गुरू पार्वती दत्ता यांच्यासह चिनी पाहुण्यांनी नृत्यातील अशी भावमुद्रा साकारली.