शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

चिकलठाणा एमआयडीसी? नको रे बाबा; अंतर्गत रस्त्यांची झाली चाळण, पाठदुखीची काळजी घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2022 17:06 IST

चिकलठाणा एमआयडीसीतील एकूण उद्योगांच्या ५० टक्केच उद्योग सुरू आहेत.

- बापू सोळुंकेऔरंगाबाद : केंद्र सरकारच्या उद्योग संवर्धन आणि अंतर्गत विभागाने प्रसिद्ध केलेल्या ‘लीडस’ सर्वेक्षणामध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे कार्य देशभरात अव्वल असल्याचे निष्पन्न झाले. यात पायाभूत सुविधा हा घटक अत्यंत महत्त्वाचा निकष होता. औरंगाबाद जिल्ह्यात पाच औद्योगिक वसाहती आहेत. यातील चिकलठाणा एमआयडीसीतील सुमारे १७ किलोमीटर रस्त्यांची चाळणी झाली आहे. सुमारे २५ वर्षांपासून या रस्त्याची डागडुजी झाली नाही. यामुळे येथे उद्योजकांना पाठदुखीचा त्रास सुरू झाला असल्याने ‘चिकलठाणा एमआयडीसी? नको रे बाबा’ म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

केवळ ५० टक्के उद्योग सुरूचिकलठाणा एमआयडीसीतील एकूण उद्योगांच्या ५० टक्केच उद्योग सुरू आहेत. यातील अनेक उद्योग विदेशात त्यांची उत्पादने निर्यात करतात.

२०० उद्योग बंदचचिकलठाणा एमआयडीसीमध्ये १६५ मोठे तर ११४१ लघु उद्योगांचे भूखंड आहेत. मात्र, काही वर्षांपासून येथील लहान, मोठे सुमारे २०० उद्योग बंद पडले आहेत. यातील अनेक जागांवर रहिवासी इमारती, दुकाने सुरू आहेत.

रस्ते नावालाचचिकलठाणा औद्योगिक वसाहतीमध्ये सुमारे ३१.८ किलोमीटरचे रस्ते आहेत. यापैकी केवळ ११ किमी लांबीच्या रस्त्याची नुकतीच कामे झाली. उर्वरित १७ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे २५ वर्षांपासून कोणतेही काम नाही. यामुळे या वसाहतीमधील अंतर्गत आणि मुख्य रस्ते नावालाच असल्याचे उद्योजक संतप्तपणे सांगतात.

सांडपाणी रस्त्यावरचिकलठाणा एमआयडीसीमध्ये महापालिकेने ड्रेनेजलाइन टाकलेली नाही. उद्योजकांनी शौच खड्डे खोदून त्यांच्या पाण्याची व्यवस्था केली. मात्र, काही उद्योगाचे सांडपाणी रस्त्यावर वाहते. पावसाळ्यात तर साचलेल्या पाण्यात रस्ते गडप होतात.

रस्त्याची चाळणी झाली एमआयडीसीचे रस्ते मनपाकडे वर्ग झाल्यानंतर चिकलठाणा एमआयडीसी मनपाला दरमहा ३० कोटी रुपयांची जकात द्यायची. कोट्यवधींचा महसूल देणाऱ्या या वसाहतीतील रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी ‘मसिआ’ने मनपा आणि एमआयडीसीला अनेक निवेदने दिली. मात्र, एमआयडीसीतील मोजक्याच दोन-तीन रस्त्यांची कामे झाली. एच सेक्टरमधील रस्त्यांची नुसती चाळणी झाल्याने तेथे मालाची ने-आण करण्यासाठी वाहनेही नेता येत नाहीत.-अर्जुन गायके, उद्योजक.

शासनाकडे पाठपुरावा सुरू१२ किलोमीटरचे रस्ते खूप खराब आहेत. पूनम बिस्कीट कंपनीसमोर पाणी साचल्याने लोक त्या पाण्यात वाहने धूत असतात. खड्डेमय रस्ते दुरुस्त करण्यासाठी लघु उद्योजकांची संघटना असलेल्या मसिआच्या वतीने मनपा आणि शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे, मात्र अद्यापही कार्यवाही नाही.- भगवान राऊत, उपाध्यक्ष, मसिआ.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAccidentअपघातMIDCएमआयडीसी