शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
3
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
4
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
5
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
6
‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
7
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
8
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
9
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
10
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
11
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
12
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
13
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
14
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
15
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
16
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
17
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
18
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
19
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
20
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा

"मुख्यमंत्र्यांची ऑनलाईन उपस्थिती देशभक्ती, मग माझी गैरहजेरी राष्ट्रद्रोह का?"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2020 18:51 IST

जिल्ह्याचे खा. इम्तियाज जलील यांची मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनी गैरहजर राहण्याची परंपरा यंदाही कायम राहिली.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमास येण्यास नकार दिल्याचा खा. जलील यांचा आरोपरझाकारी विचारांनी भारलेल्यांनी देशभक्ती शिकविण्याची गरज नाही

औरंगाबाद : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या कार्यक्रमाला हजर राहण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे नकार दिला. त्यांची ऑनलाईन हजेरी देशभक्ती, तर माझी गैरहजेरी राष्ट्रदोह का? असे सवाल करणारे टष्ट्वीट खा. इम्तियाज जलील यांनी केले आहे. 

जिल्ह्याचे खा. इम्तियाज जलील यांची मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनी गैरहजर राहण्याची परंपरा यंदाही कायम राहिली. खा. जलील हे संसद अधिवेशनासाठी दिल्लीत आहेत; परंतु त्यांनी टिष्ट्ववटरद्वारे  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टीकेचे लक्ष्यकरून शिवसेनेला डिवचले आहे.  पहिल्या टष्ट्वीटमध्ये ते म्हणतात, शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कार्यक्रमाला येण्यास स्पष्ट नकार दिला. मराठवाड्याबद्दल माझ्या सचोटी आणि निष्ठेवर प्रश्न विचारणारे मुख्यमंत्र्यांना प्रश्न का करीत नाहीत. यालाच मी दुहेरी मापदंड म्हणतो, तर दुसऱ्या टष्ट्वीटमध्ये ते म्हणतात, मराठवाडा मुक्तिसंग्राम कार्यक्रमात माझी अनुपस्थिती म्हणजे राष्ट्रविरोधी आणि मुख्यमंत्र्यांची अनुपस्थिती म्हणजे देशभक्ती का? आता निष्ठेचे प्रमाणपत्र देणारे आणि माध्यम गप्प का आहेत? 

सिद्धार्थ उद्यानातील मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपल्यानंतर खा. जलील यांच्या विरोधात काही तरुणांनी जोरदार  घोषणाबाजी करीत त्यांचा निषेध केला, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: कार्यक्रमाला येणे अपेक्षित असताना त्यांनीही आॅनलाईन संदेश देत विभागाच्या भावनांचा अवमान केला, असा आरोप करीत युवक घोषणा देत होते. मराठवाडा विकास मंच या संघटनेच्या दत्तात्रय जांभूळकर, सागर शिंदे, गोविंद देशपांडे यांनी मुख्यमंत्री आणि जलील यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. 

आजवर सतत गैरहजर राहिले खा. जलील२०१५ पासून इम्तियाज जलील हे लोकप्रतिनिधी आहेत. आॅक्टोबर २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यापासून मे २०१९ मध्ये लोकसभेवर निवडून गेले तरी त्यांनी मराठवाड मुक्तिसंग्राम दिनाला एकदाही हजेरी लावली नाही. जलील हे एमआयएम या पक्षाचे नेतृत्व करतात, हैदराबादस्थीत एमआयएमचे ध्येयधोरण निजाम धार्जीने असल्याने  ते या कार्यक्रमाला हजर राहत नसल्याचा आरोप सातत्याने त्यांच्यावर केला जातो. 

रझाकारी विचारांनी भारलेल्यांनी देशभक्ती शिकविण्याची गरज नाहीठाकरे यांना खा. जलील यांच्यासारख्या रझाकारी विचारांनी भारलेल्यांनी देशभक्ती शिकविण्याची गरज नाही.  मागील पाच वर्षांपासून ते या कार्यक्रमाला गैरहजर राहत आहेत. खा. जलील यांनी टष्ट्वीटद्वारे शुभेच्छा दिल्या असत्या, तर त्या सर्वांनी स्वीकारल्या असत्या. सोशल मीडियातून असे व्यक्त होणे हीदेखील रझाकारी पद्धतच आहे. त्यांच्या पक्षाचा विचार जगाला माहिती आहे. गैरहजर राहून जलील यांनी रझाकारी दाखविली आहे, असे प्रत्युत्तर शिवसेना आ. अंबादास दानवे यांनी खा. जलील यांना दिले आहे. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेImtiaz Jalilइम्तियाज जलीलMarathwadaमराठवाडाAurangabadऔरंगाबाद