शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांचा फोन आला, तरीही फुलंब्रीतून शिंदेसेनेच्या जिल्हाप्रमुखांची बंडखोरी कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2024 19:26 IST

अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महायुतीच्या नेत्यांची धावाधाव निष्फळ

फुलंब्री : फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून महायुतीत बंडखोरी केलेले शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख रमेश पवार हे दोन दिवसांपासून ‘नॉट रिचेबल’ असल्याने सोमवारी उमेदवारी अर्ज परत घेण्याच्या शेवटच्या दिवशीही त्यांचा शोध घेण्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी केलेली धावाधाव निष्फळ ठरली.

फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायचीच असा निश्चय करून शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख रमेश पवार यांनी गेल्या काही महिन्यांपासून निवडणुकीची तयारी चालवली होती. त्यानुसार त्यांनी स्वतंत्र यंत्रणाही राबविली. त्यानंतर त्यांनी काही दिवसांपूर्वी उमेदवारी अर्जही दाखल केला. येथे महायुतीच्या उमेदवार भाजपाच्या अनुराधा चव्हाण असल्याने महायुतीत बंडखोरी नको म्हणून युतीतील नेत्यांनी त्यांनी अर्ज परत घ्यावा, यासाठी बरेच प्रयत्न चालवले. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ३१ ऑक्टोबर व ४ नोव्हेंबर हे दोनच दिवस मिळाले असताना गेल्या दोन दिवसांपासून पवार हे नॉट रिचेबल होते. उमेदवारी अर्ज परत घेण्यासाठी महायुतीच्या अनेक नेत्यांनी त्यांचा शोध घेतला; परंतु पवार हे मोबाइल बंद करून अज्ञातस्थळी निघून गेल्याने महायुतीच्या नेत्यांचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. परिणामी सोमवारीही पवार यांनी सोमवारी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज परत न घेतल्याने महायुतीतील बंडखोरी कायम आहे. त्यांच्या बंडखोरीचा महायुतीच्या उमेदवार अनुराधा चव्हाण यांच्या मतावर कितपत परिणाम होतो, हे निवडणूक निकालाअंती समजणार आहे.

मुख्यमंत्र्यांचा फोन, तरीही...दरम्यान, याबाबत शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख रमेश पवार यांच्याशी १ नोव्हेंबर रोजी सदरील प्रतिनिधीने संपर्क साधला असता ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आपणास उमेदवारी अर्ज परत घेण्यासाठी फोन केला होता; पण आपण उमेदवारी कायम ठेवण्यावर ठाम असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकphulambri-acफुलंब्रीEknath Shindeएकनाथ शिंदे