शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी

By बापू सोळुंके | Updated: September 13, 2025 11:53 IST

या सरकारची केवळ लाडकी बहिण योजना सोडली तर अन्य एकही योजना काम करीत नाहीत

छत्रपती संभाजीनगर: मराठा समाजासाठी हैदराबाद गॅझेटिअर लागू झाल्यामुळे ओबीसी समाजात अस्वस्थता आहे. काल एका तरुणाने आत्महत्या केली. अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांनी चालता-बोलता पत्रकारांशी न बोलणं शोभत नाही.  दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच मनोज जरांगे पाटील, छगन भुजबळ यांच्यासोबत एकत्रित पत्रकार परिषद घ्यावी. त्यांच्याकडे  जागा नसेल तर शिवसेनाभवनमध्ये जागा देतो, पण पंतप्रधान मोदी सारखं पत्रकार परिषद घ्यायला घाबरू नये, टोला उद्धवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी शनिवारी(दि.१३) येथे पत्रकार परिषदेत केली.

खा.राऊत छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आले असता शनिवारी त्यांनी जालना रोडवरील एका हॉटेलमध्ये पत्रकारांशी संवाद साधला.  अनैतिक कृत्यातून हे सरकार अस्तित्वात आले आहेत. भ्रष्टाचार, आर्थिक लूटीच्या योजनांच या सरकारच्या सुरू असल्याचा आरोप खा.राऊत यांनी केला. मुख्यमंत्र्यांचा तुम्ही सक्षम नेतृत्व असा उल्लेख केला, याकडे लक्ष वेधले असता खा.राऊत म्हणाले की, होय, देशात पंतप्रधान नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र हे  सक्षम नेतृत्व ते म्हणतात ना, त्यांनी अनेक प्रश्न सोडवले आहेत.  सोलापूर जिल्ह्यातील कुर्डू येथील अवैध उत्खनन प्रकरणांत मुख्यमंत्र्यांनी अहवाल मागितला आहे, याविषयी विचारले असता ते म्हणाले की मुख्यमंत्री अहवाल मागविणे आणि एसआयटी नेमण्यात विक्रम करीत आहेत. कारवाई मात्र ते करत नसल्याचे राऊत म्हणाले. बंजारा समाजाने हैदराबाद गॅझेटिअरनुसार एस.टी. प्रवर्गातून आरक्षणाची मागणीवर मुख्यमंत्र्यांनी बोलावे, असे राऊत म्हणाले. लाखो मते चोरी करून त्यांनी बहुमत मिळवले आहे. यामुळे हा प्रश्न त्यांनी सोडविला पाहिजे. या सरकारची केवळ लाडकी बहिण योजना सोडली तर अन्य एकही योजना काम करीत नसल्याचा आराेप त्यांनी केला.

...तेव्हा पंतप्रधान मोदींनी तोंड उघडले नाहीजेव्हा मणीपुर जवळ होते, कारगिल युद्धात भाग घेतलेल्या सैनिकी अधिकाऱ्यांच्या पत्नीची विटंबना सुरू होती, तरुण मारले जात होते, महिलांची नग्न धिंड काढली जात होती, तेव्हा मोदींनी तोंड उघडले नाही. आता ते तेथे जाऊन कोणाला भेटणार, काय बोलणार , त्यांचा दौरा म्हणजे निव्वळ बकवास आणि ढोंग आहे, असा आरोप राऊत यांनी  केला.

प्रखर राष्ट्रभक्त भारत-पाक सामना पाहणार नाहीभारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या तिकिटांना फारसा प्रतिसाद नाही, याविषयी विचारले असता राऊत म्हणाले की, “माझ्या माहितीप्रमाणे लोक भारतात सुद्धा ती मॅच पाहणार नाहीत, जे प्रखर राष्ट्रभक्त आहेत, ज्यांनी पहलगाम हल्ला पाहिलाय, देश त्या धक्क्यातून अजूनही सावरलेला नाही, असे लाखो क्रिकेटप्रेमी असले, तरी ते हा सामना पाहणार नाहीत. भाजपचे लोक पाहतील.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलChhagan Bhujbalछगन भुजबळMaratha Reservationमराठा आरक्षण