शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगाव-भीमा येथील घटनेस मुख्यमंत्री जबाबदार; आपच्या प्रीती मेनन यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 13:53 IST

कोरेगाव-भीमामधील घटनेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असल्याचा आरोप आम आदमी पार्टी या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्या प्रीती मेनन यांनी केला.

ठळक मुद्दे कोरेगाव-भीमामधील घटनेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असल्याचा आरोप आम आदमी पार्टी या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्या प्रीती मेनन यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी घटनेच्या दिवशीच जर दलित बांधवांबद्दल सहानुभूती व्यक्त करीत दोषींवर कारवाईचे आदेश दिले असते, तर महाराष्ट्रात उद्रेक झाला नसता, असे मत व्यक्त करीत त्यांनी भाजप, संघावर टीका केली. 

औरंगाबाद : कोरेगाव-भीमामधील घटनेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असल्याचा आरोप आम आदमी पार्टी या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्या प्रीती मेनन यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी घटनेच्या दिवशीच जर दलित बांधवांबद्दल सहानुभूती व्यक्त करीत दोषींवर कारवाईचे आदेश दिले असते, तर महाराष्ट्रात उद्रेक झाला नसता, असे मत व्यक्त करीत त्यांनी भाजप, संघावर टीका केली. 

राज्यातील भाजप सरकारला शरद पवार आणि त्यांच्या पक्षाचा पाठिंबा आहे, त्यामुळे सिंचन घोटाळा प्रकरणात अजित पवार यांना अटक करण्याची हिंमत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करू शकणार नाहीत,अशी टीका करीत फडणवीस सरकारने जे सिंचन प्रकल्प विरोध करीत रोखले होते, ते सर्व प्रकल्प पुन्हा नव्याने सुरू करण्याची घोषणा सरकारने केल्याचे मेनन  यांनी नमूद केले. सिंदखेडराजा येथे जिजाऊ जयंतीनिमित्ताने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत होणार्‍या कार्यक्रमाची पूर्वतयारी व पाहणी करण्यासाठी प्रीती मेनन आल्या होत्या. यावेळी येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत त्यांनी संवाद साधला.

गेल्या काही दिवसांपासून कुमार विश्वाससह पक्षातील काही जुने नेते हे पक्षाच्या कार्यपद्धतीवर आरोप करीत आहेत, याबद्दल विचारले असता, मेनन  म्हणाल्या की, हे सर्वच पक्षांत असते; मात्र प्रत्येकाला पक्षाच्या ध्येयधोरणानुसार वागावे लागते, तसे केले नाही तर स्वत: बाहेर पडावे लागते किंवा पक्ष त्यांना बाहेर काढतो़  अण्णा हजारे जर आमच्या सोबत आले तर चांगलेच होईल, पण ते राजकारणापासून दूर आहेत. तरीसुद्धा महाराष्ट्रातील विकास आणि भ्रष्टाचारमुक्त कारभारासाठी त्यांची भेट घेत सहकार्य करण्याचे आवाहन करणार असल्याचे त्या म्हणाल्या. 

१२ जानेवारी रोजी घोषणा महाराष्ट्राच्या राजकारणात आम आदमी पार्टी लवकरच सक्रिय होणार आहे़  २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ‘आप’ उमेदवार उभे करणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय प्रवेशाची सुरुवात सिंदखेडराजापासून होईल़  १२ जानेवारीला मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ यांना अभिवादन करण्यात येईल. त्यानंतर होणार्‍या सभेत ते महाराष्ट्रात आप सक्रिय होण्याची घोषणा करतील. जिल्हानिहाय कार्यकर्त्यांचे जाळे उभे करून आगामी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत २८८ पैकी २४५ जागा लढण्याची पक्षाची तयारी आहे़  

टॅग्स :AAPआपAurangabadऔरंगाबादMaharashtra Bandhमहाराष्ट्र बंदBhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचार