शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांना विरोध कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 00:05 IST

पंढरपुरात दाखल झालेले वारकरी हे आमचेच माय-बाप आहेत. त्यांच्या सुरक्षेला मराठा क्रांती मोर्चाकडून कोणताही धोका नाही. वारकºयांना त्रास होईल, असे आंदोलन पंढरपूर किंवा वारकरी थांबलेल्या परिसरात होणार नाही, अशी माहिती औरंगाबाद मराठा क्रांती मोर्चाच्या संयोजकांनी दिली.

ठळक मुद्देमराठा क्रांती मोर्चा : वारकऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : पंढरपुरात दाखल झालेले वारकरी हे आमचेच माय-बाप आहेत. त्यांच्या सुरक्षेला मराठा क्रांती मोर्चाकडून कोणताही धोका नाही. वारकºयांना त्रास होईल, असे आंदोलन पंढरपूर किंवा वारकरी थांबलेल्या परिसरात होणार नाही, अशी माहिती औरंगाबादमराठा क्रांती मोर्चाच्या संयोजकांनी दिली.मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्यभरात सुरू असलेल्या आंदोलनामुळे मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाच्या शासकीय पूजेसाठी न जाण्याचा निर्णय घेतला आहे. वारकºयांच्या सुरक्षेला धोका असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला. यावर औरंगाबाद मराठा क्रांती मोर्चातर्फे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. पंढरपुरात वारकरी जेथे थांबले असतील, तेथे कोणतेही आंदोलन केले जाणार नाही. वारीच्या आडून काही धर्मांध शक्ती मराठा क्रांती मोर्चाच्या नावाने गोंधळ घालण्याची शक्यता आहे. त्याचे खापर मराठा समाजावर फोडण्याचे कारस्थान रचले जात आहे. पंढरपुरात येणाºया वारकºयांमध्ये आमचेच माय-बाप आहेत. त्यांना कोणताही त्रास होणार नाही, असे कृत्य मराठा क्रांती मोर्चातर्फे केले जाणार नाही. तसा निर्णय घेतला असल्याचेही मराठा क्रांती मोर्चाने स्पष्ट केले आहे.मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाचा निर्णय घेऊनच पंढरपुरात विठ्ठलाच्या शासकीय महापूजेला जायला हवे होते. त्यांनी घेतलेली भूमिका ही निर्ढावलेपणाची आहे. आता मराठा समाज आरक्षणासाठी यापेक्षाही अधिक तीव्र आंदोलन करील. राज्याच्या परिवहनमंत्र्यांनी एस.टी. बसच्या झालेल्या तोडफोडीची नुकसानभरपाई आंदोलनकर्त्यांकडून वसूल करणार असल्याचे सांगितले. इतरवेळी मंत्री गप्प बसतात; मात्र मराठा समाजाच्या वेळीच यांना नियम, कायदे दिसतात, असे स्पष्ट करीत परिवहनमंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेधही करण्यात आला.दुसºया दिवशी ठिय्या आंदोलन कायममराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्यभरात सुरू असलेल्या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदविण्यासाठी क्रांती चौकात शनिवारपासून ठिय्या आंदोलन सुरू आहे. दुसºया दिवशीही मराठा समाजातील नागरिक, युवक, विद्यार्थी, विविध संघटनांच्या पदाधिकाºयांनी घटनास्थळी येत आंदोलनात सहभाग नोंदवला.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाAurangabadऔरंगाबादChief Ministerमुख्यमंत्री