शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

असेही गाव, जेथे १०० वर्षांत ना कोणी घरासमोर मंडप उभारला ना लग्न लावले; रंजक आहे कारण

By प्रशांत तेलवाडकर | Updated: May 20, 2023 15:38 IST

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील या गावात ‘नो बॅंड बाजा बराती’

छत्रपती संभाजीनगर : सर्वत्र लग्नसराईची धुमधाम सुरू आहे. गावागावातही भले मोठे मंडप टाकून धुमधडाक्यात लग्न पार पडत आहे. मात्र, पैठण तालुक्यातील ‘हिवरा चौंढाळा’ या गावात मात्र, मागील १०० वर्षांत कोणी घरासमोर मंडप उभारलेला किंवा लग्न लावलेले नाही. याचा अर्थ या गावात सर्व अविवाहित आहेत असे नाही. गावाच्या वेशीबाहेर जाऊन हनुमान मंदिराच्या साक्षीने लग्न लावले जातात. पण गावात कोणी लग्न लावण्याचे धाडस करीत नाही.

हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटले असेल... मात्र, हे तेवढेच सत्य आहे. छत्रपती संभाजीनगर शहराकडून ‘बीड’ कडे जाताना ७० कि.मी अंतरावर ‘हिवरा चोंढाळा’ हे गाव आहे. या गावात श्रीक्षेत्र माहूरच्यादेवीचे उपपीठ आहे. येथे दगडी चिरेबंदी वाडा असून मंदिरही संपूर्ण दगडात बनविले आहे. गाभाऱ्यात चार बाय चार फुटांचा देवीचा तांदळा (मुखवटा) आहे. पाषाणातील हा तांदळा शेंदूर रंगाचा व देवीचे डोळे मोठ्या आकारातील आहे. ही देवी अविवाहित आहे. यामुळे तिचा आदर करण्यासाठी किंवा तिचा कोप होऊ नये यासाठी गावकरी गावात लग्न लावत नाही, घरासमोर मंडप उभारत नाही. गावाच्या दीड ते दोन कि.मी. वेशीबाहेर लग्न लावतात. हे मंदिर सुमारे ५०० पेक्षा अधिक वर्षांचे आहे, असे येथील गावकऱ्यांनी सांगितले. पिढ्यानपिढ्या ही परंपरा जपली जात आहे.

बाळंतीणसुद्धा झोपते जमिनीवरहिवरा चोंढाळातील देवीच्या मंदिरापेक्षा घराची उंची जास्त असू नये, यासाठी गावातील श्रीमंत असो वा गरीब कोणीही घरावर पहिला मजला बांधत नाही. सर्वजण तळमजल्यावरच राहतात. तसेच देवीची कोणी बरोबरी करू नये यासाठी सर्व जण जमिनीवर झोपतात. पलंगाचा वापर कोणी करीत नाही. बाळांतीणसुद्धा जमिनीवरच झोपते. आजपर्यंत मी कोणाला गावात लग्न लावताना पाहिले नाही.- सत्यभामा करताडे, गावातील १०० वर्ष वयाच्या आजी

लग्न लावल्यावरच नवरदेव गावात पाऊल ठेवतोगावातील तरुणीचे बाहेर गावातील तरुणाशी लग्न जुळले. तर लग्नाच्या दिवशी नवरदेव हिवरा चोंढाळा गावात पाऊल ठेवत नाही. थेट वेशीबाहेरील मंगल कार्यालयात वरात जाते. लग्न लागल्यानंतर नवरा-नवरी जोडीने गावात येतात व देवीचे दर्शन घेतात.

गावकऱ्यांची श्रद्धादेवीला लग्न करायचे नव्हते, पण दैत्यराजाने बळजबरीने लग्नाचा प्रयत्न केला. त्यावेळीस देवीचा कोप झाला व दैत्यराजाने आणलेले वऱ्हाडी दगडात रूपांतर झाले म्हणून गावाच्या आसपास लहान-मोठे असंख्य दगड दिसतात, अशी कथा पूर्वजांनी सांगितली. यामुळे कोणी गावात लग्न लावत नाही. वेशीबाहेर लग्न करतात. गावात आज ७०० लोकसंख्या आहे. देवीचे मंदिर पुरातन आहे.- कमलाकर वानोळे, पूजाअर्चा, देखभाल करणाऱ्या परिवाराचे ज्येष्ठ सदस्य

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादspiritualअध्यात्मिकmarriageलग्न