शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

छत्रपती संभाजीनगरकरांनी घेतला १८५ प्रकारच्या फ्लेव्हरसह १०० कोटींच्या आइस्क्रीमचा आस्वाद

By प्रशांत तेलवाडकर | Updated: June 13, 2024 17:13 IST

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ‘फेब्रुवारी ते मे’ या हंगामात जिल्ह्यात ३० टक्क्यांनी आइस्क्रीमची विक्री वाढली आहे.

छत्रपती संभाजीनगर : ‘आइस्क्रीम खाऊंगी, कश्मीर जाऊंगी, शोलो में भडके जिया’ हे २०१४ मधील ‘द एक्स्पोज’ चित्रपटातील गाणे गाजले होते... तसेच ‘साथ मेरे आओगी आइस्क्रीम खाओगी’ हे १९८३ मधील ‘जस्टीस चौधरी’ चित्रपटातील गाणे लोकप्रिय बनले होते. एवढेच नव्हे तर ‘टिंगू मिंगू गेले होते आइस्क्रीमच्या वनात, बटरस्कॉचची झाडे होती व्हॅनिलाच्या रानात’ हे बडबड गीतही बच्चे कंपनीच्या तोंडी होते... या गाण्यांचा उल्लेख करण्याचे कारण की, या उन्हाळ्यात छत्रपती संभाजीनगरवासीयांनी चक्क १०० कोटींच्या आइस्क्रीमचा आस्वाद घेतला. ही आकडेवारी खुद्द आइस्क्रीम उत्पादक संघटनेने दिली.

शहरातील उच्चांकी तापमान नोंदले ४३ अंश१९७२ च्या दुष्काळापासून ते आजपर्यंत सर्वाधिक उष्ण उन्हाळा यंदाचा ठरला. पहिल्यांदाच शहराचे तापमान ४३ अंशांपर्यंत जाऊन पोहोचले होते. उन्हाळ्यात मनाला व शरीराला थंडावा देणाऱ्या आइस्क्रीमची यंदा सर्वाधिक उलाढाल झाली.

३० टक्क्यांनी वाढली विक्रीमागील वर्षीच्या तुलनेत यंदा ‘फेब्रुवारी ते मे’ या हंगामात जिल्ह्यात ३० टक्क्यांनी आइस्क्रीमची विक्री वाढली आहे. चार महिन्यांत १०० कोटींची उलाढाल आइस्क्रीममध्ये झाली. शहरात ८ ते १० मोठ्या आइस्क्रीम उत्पादक कंपन्या आहेत. वाळूज औद्योगिक वसाहत, चिकलठाणा व नारेगाव येथे या कंपन्या आहेत.- अनिल पाटोदी, अध्यक्ष, आइस्क्रीम मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन

जिल्ह्यातील आइस्क्रीमची विक्रीवर्ष उलाढाल२०२२ ६५ कोटी२०२३ ७५ कोटी२०२४ १०० कोटी

१८५ प्रकारचे फ्लेव्हरआइस्क्रीममध्ये आता फ्लेव्हरला जास्त मागणी आहे. यंदा १८५ फ्लेव्हरमध्ये आइस्क्रीम उपलब्ध झाले. यात फळांचा स्वाद, फुलांच्या स्वादातील आइस्क्रीमला मागणी जास्त होती. यात आइस्क्रीमसोबत कोन व कुल्फीलाही आबालवृद्धांची पसंती मिळाली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMarketबाजार