शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नवोदय परीक्षेत जिल्हा परिषद शाळांचा डंका! ६० पैकी ४४ जागांवर ग्रामीण विद्यार्थ्यांची बाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 20:07 IST

जि.प. शाळांचे विद्यार्थी 'लय हुशार'; नवोदय प्रवेश परीक्षेत ७५% यश, शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांची माहिती

- राम शिनगारे

छत्रपती संभाजीनगर : केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशासाठी घेतलेल्या परीक्षेत जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी बाजी मारली. ग्रामीण भागासाठी राखीव असलेल्या ६० जागांपैकी तब्बल ४४ जागांवर जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांची निवड झाल्याची माहिती प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी दिली. त्यामुळे पुन्हा एकदा जि.प.चे विद्यार्थी ‘लय हुशार’ असल्याचा प्रत्यय आला.

केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालयातील प्रवेशासाठी १३ डिसेंबर २०२५ रोजी ५२ केंद्रांवर परीक्षा घेतली होती. या परीक्षेसाठी जिल्ह्यातील १९ हजार ३११ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. १७ हजार ८२९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातून ८० विद्यार्थ्यांची निवड केली आहे. त्यात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ६० जागा तर शहरीसाठी २० जागा राखीव होत्या. ग्रामीणच्या राखीव ६० जागांपैकी तब्बल ४४ जागा जि.प. शाळेच्या विद्यार्थ्यांना पटकावल्या. टक्केवारीत जवळपास ७५ टक्के विद्यार्थी जि.प.चे असल्याचेही शिक्षणाधिकारी चव्हाण यांनी सांगितले.

जिल्ह्यात ३ हजार ४५ शाळाजिल्ह्यात प्राथमिक शिक्षण देणाऱ्या ३ हजार ४५ शाळा आहेत. त्यातील २ हजार ९० शाळा जि.प.च्या आहेत. या शाळांमधील १९ हजार ३०८ विद्यार्थ्यांनी नवोदय परीक्षेसाठी अर्ज केला होता. नवोदय विद्यालय ही केंद्र सरकारची निवासी व मोफत शाळा असून, गुणवंत विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची संधी मानली जाते.

‘एनएमएमएस’ परीक्षेनंतर नवोदयमध्ये यशराष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्ती योजना परीक्षेत जिल्ह्यातून १ हजार ३१२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. त्यामध्ये जिल्हा परिषद शाळांमधील तब्बल ९२५ विद्यार्थ्यांचा समावेश होता. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ९वी ते १२वी पर्यंत प्रतिवर्ष १२ हजार रुपये शिष्यवृत्ती मिळते. तर नवोदय विद्यालयात निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे सहावी ते बारावीपर्यंतचे शिक्षण संपूर्णपणे मोफत मिळते.

नवोदयमध्ये जि.प. विद्यार्थ्यांचा चढता आलेखशैक्षणिक वर्ष..................निवड झालेले विद्यार्थी२०२२-२३..................................१४२०२३-२४..................................२०२०२४-२५...................................३४२०२५-२६....................................४४

तालुकानिहाय निवड झालेले विद्यार्थीतालुका..........................विद्यार्थीछत्रपती संभाजीनगर................२सिल्लोड..........................९सोयगाव.........................३पैठण.............................७वैजापूर..........................१०गंगापूर..........................७फुलंब्री..........................२कन्नड...........................४------------------------------------एकूण...........................४४

जि.प. शाळांमधील शिक्षक, अधिकाऱ्यांनी घेतलेल्या मेहनतीचे हे फळ आहे. मागील चार वर्षांपासून गुणवत्तेचा आलेख सतत उंचावत आहे. वरिष्ठांचे मार्गदर्शन, शिक्षकांचे अध्यापन आणि विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांमुळे नवोदय परीक्षेत विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे.-जयश्री चव्हाण, शिक्षणाधिकारी, प्राथमिक

English
हिंदी सारांश
Web Title : Zilla Parishad Schools Shine in Navodaya Exam: Rural Students Triumph!

Web Summary : Zilla Parishad schools excelled in the Navodaya entrance exam. Out of 60 rural seats, Zilla Parishad students secured 44. This success highlights the quality education provided in rural schools, marking a significant achievement for the students and educators involved.
टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर