शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पैठणचा रणसंग्राम: भुमरे पिता–पुत्रांचे वर्चस्व मोडणार की पुन्हा सत्ता? भाजपपुरस्कृत अपक्ष अन् विरोधकांचे तगडे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 19:50 IST

चितेगावसह मोठ्या गटांत काट्याची लढत

- अनिलकुमार मेहेत्रेपैठण : तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक ही केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांची लढत न राहता, सत्तेची आणि प्रतिष्ठेची एक मोठी कसोटी ठरली आहे. शिंदेसेनेचे खासदार संदीपान भुमरे आणि आमदार विलास भुमरे या पिता-पुत्रांच्या वर्चस्वाला धक्का देण्यासाठी विरोधकांनी कंबर कसली असतानाच, भाजपच्या आक्रमक भूमिकेने या निवडणुकीत मोठी रंगत निर्माण केली आहे.

तालुक्यातील ९ जिल्हा परिषद गट आणि १८ पंचायत समिती गणांमध्ये निवडणूक होत आहे. पैठणमध्ये सध्या सर्वच सत्ताकेंद्रांवर भुमरे पिता-पुत्रांचे वर्चस्व आहे. नुकत्याच झालेल्या पैठण नगरपरिषदेच्या निवडणुकीतील शिंदेसेनेने एकहाती सत्ता संपादन करून विरोधकांचे पानिपत केले. असे असताना भाजपसह सर्वच विरोधी पक्षांनी भुमरे पिता-पुत्रांचे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी कंबर कसली आहे. काँग्रेसचे अनिल पटेल, राष्ट्रवादी (शरद पवार) चे माजी आमदार संजय वाघचौरे, भाजपचे दत्ता गोर्डे, उद्धवसेनेचे सचिन घायाळ आणि सुनील शिंदे यांनी 'सत्ता विरुद्ध जनभावना' असा पवित्रा घेत तगडे आव्हान उभे केले आहे. विशेषतः चितेगाव, बिडकीन, पाचोड, आडूळ आणि ढोरकीन या मोठ्या गटांमध्ये काट्याची लढत पाहायला मिळत आहे.

दुसरीकडे राज्य व केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपची नगर पालिका निवडणुकीत वाताहत झाली होती. त्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत सिल्लोड वगळता इतरत्र भाजप-शिंदेसेनेची युती असल्याचे जाहीर करण्यात आले होते; परंतु समाधानकारक जागा मिळाल्या नसल्याने शेवटच्या क्षणी भाजपने उमेदवारी अर्ज दाखल केले होते; परंतु शिंदेसेनेच्या आक्षेपानंतर वेळेत पक्षाचे बी फाॅर्म दिले नाही, म्हणून भाजपच्या सर्व उमेदवारांना अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची वेळ आली. आता भाजपपुरस्कृत हा अपक्ष उमेदवार काही जादू करणार की भुुमरे पिता-पुत्र त्यांना कात्रजचा घाट दाखवणार हे निवडणूक निकालांती स्पष्ट होणार आहे.

प्रचाराचा शेवटचा टप्पाउमेदवारांनी आता कॉर्नर बैठका, पदयात्रा आणि थेट घरभेटींवर भर दिला आहे. ९ फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर होणार असून, पैठणच्या राजकारणात भुमरे पिता-पुत्रांचे नेतृत्व अधिक बळकट होणार की भाजप पुरस्कृत अपक्ष आणि विरोधक नवी समीकरणे मांडणार, याचा फैसला होणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Paithan Election Battle: Bhumare Father-Son Dominance Challenged by Rivals, BJP

Web Summary : Paithan's local elections see Bhumare father-son facing strong opposition. BJP-backed independents challenge their dominance amidst a tight race. Results decisive.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर