शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगर तालुक्याला मिळणार आणखी दोन उपबाजारपेठा 

By प्रशांत तेलवाडकर | Updated: December 14, 2023 20:06 IST

लाडसावंगी, माळीवाडा परिसराची निवड, २०१ गावांना होणार फायदा

छत्रपती संभाजीनगर : जाधववाडीतील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती जिल्ह्यातील सर्वांत मोठी बाजार समिती आहे. याअंतर्गत करमाड व पिंप्रीराजा येथे उपबाजारपेठ आहेच शिवाय आता लाडसावंगी व माळीवाडा अशा आणखी दोन उपबाजारपेठा उभारण्यात येणार आहेत. या ४ उपबाजारपेठांचा तालुक्यातील २०१ गावांतील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. त्यांना आपला शेतीमाल विक्रीसाठी परजिल्ह्यात जाण्याची आता गरज भासणार नाही. 

शेतीमालाचा योग्य भाव शेतकऱ्यांना मिळावा, त्यांच्या हिताचे संरक्षण व्हावे यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना करण्यात आली. १९९८ मध्ये जाधववाडीत २०९ एकरवर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीचे भव्य संकुल उभारण्यात आले. करमाड उपबाजारपेठेची ८ एकर जागा होती. तिथे बाजार संकुल उभारले आहे. तिथेही शेतीमालाची मोठी आवक होत आहे. पिंप्रीराजा येथील ६ एकर जमीन बाजार समितीने पूर्वीच घेतली असून तिथे कै. सखाराम पाटील पवार यांच्या नावाने उपबाजारपेठ उभारण्यासाठी शासनाची परवानगी मिळाली आहे. याशिवाय विद्यमान संचालक मंडळांनी आणखी दोन उपबाजारपेठ उभारण्याचा विडा उचलला आहे. 

लाडसावंगी व माळीवाडा येथे प्रत्येकी १० एकर जागा खरेदीसाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. पिंप्रीराजा येथे मोसंबीसह अन्य शेतमालाचे आडत मार्केट होणार आहे. तर, समृद्धी महामार्गाजवळ असलेल्या लाडसावंगी येथे टोमॅटो, मोसंबी, डाळींब, भाजीपाला व भुसार मालाचे आडत बाजार व तिथेच प्रोसिसिंग युनिट उभारले जाणार आहे. जेणेकरून तिथून माल समृद्धी महामार्गाद्वारे मुंबई-नागपूरपर्यंत लवकर पोहोचविला जाईल. यामुळे तालुक्यातीलच २०१ गावांतील शेतकऱ्यांना आपल्या गावाजवळील उपबाजारपेठेत जाऊन शेतीमाल विकता येणार आहे. मालवाहतूक भाड्यातही मोठी बचत होणार आहे. तसेच स्पर्धा निर्माण झाल्याने शेतीमालास चांगला भाव मिळणार आहे.

जागा खरेदीसाठी शोध मोहीम वर्षभरात उभारणार उपबाजारपेठ पिंप्रीराजा येथे उपबाजारपेठ, सेल हॉल, आडत्यांसाठी गाळे, शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधण्यासाठी शासनाची मंजुरी मिळत आहे. येथील काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. तसेच, लाडसावंगी व माळीवाडा परिसरात उपबाजारपेठ व प्रोसिसिंग युनिट उभारण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. तो पणन संचालकांना पाठविण्यात येत आहे. जागा खरेदीसाठी शोध मोहीम सुरू झाली आहे. आ. हरिभाऊ बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही उपबाजारपेठ वर्षभरात उभारली जाईल.-राधाकिसन पठाडे, सभापती, उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती

जळगाव रोडवर कृउबाचे भव्य प्रवेशद्वारजाधववाडीतील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीचे जळगाव रोडवर प्रवेशद्वार नव्हते. मात्र, आता ३० मीटर रुंद व ७.५ मीटर उंचीचे भव्य प्रवेशद्वार उभारण्यात येत आहे. जानेवारीत या कामाला सुरुवात होत आहे. अनेक वर्षांपासून शेतकरी, व्यापारी व ग्राहकांची मागणी आता यानिमित्ताने पूर्ण होत आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रAurangabadऔरंगाबादFarmerशेतकरी