शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

आमचं शहर अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर; अर्ध्या तासात पेट्रोल बॉम्ब कुठून आले? संजय शिरसाटांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2023 16:42 IST

'ही घडवून आणलेली दंगल आहे, असा माझा आरोप आहे. बोलायचं एक आणि करायचं दुसरं, हे शहराच्या शांततेसाठी योग्य नाही.'

छत्रपती संभाजीनगर: आज राम नवमी आहे, याला गालबोट लावण्याचा प्रयत्न शहरात झाला आहे. शहरातील किराडपुरा परिसरात असलेल्या राम मंदिराजवळ काल मध्यरात्री दोन गटात तुफान हाणामारी झाली. यावेळी दोन्ही गटाकून दगडफेक आणि जाळपोळीची घटना झाली. या घटनेत पोलिसांच्या गाड्यासह इतर अनेक गाड्या जाळण्यात आल्या. या घटनेनंतर शहरातील पूर्व मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाट यांनी मोठा प्रश्न उपस्थित केला आहे. 

पेट्रोल बॉम्ब कुठून आले? मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना संजय शिरसाट म्हणाले, 'इम्तियाज जलील यांनी ज्याप्रकारे स्टेटमेंट दिलं, त्याचा परिणाम युवा वर्गावर झाला आहे. आज कोणी कितीही नकार देत असले, तरी एका विशिष्ट युवा वर्गाने हे घडवून आणलं आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे, समाजात तेढ निर्माण करू नका. या घटनेची सुरुवात दोन गटात झाली, मग अवघ्या अर्ध्या तासात यांच्याकडे पेट्रोल बॉम्ब कुठून आले? अर्ध्या तासात पेट्रोल बॉम्ब तयार होतात?' असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. 

आमचं शहर हिटलिस्टवरते पुढे म्हणाले, 'आमचं शहर अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर आहे. भारतात ज्या अतिरेकी कारवाया होतात, त्यात आमच्या शहराचे नाव आहे. याच्याकडे पोलिसांनी बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. आम्हाला शहराची शांतता बिघडवायची नाही. सध्या रमजानचा महिना सुरू आहे, आज रामनवमी आहे आणि लवकरच जैन समाजाचा उत्सवर आहे. अशा परिस्थितीत शहराचे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करू नये. मी याबाबत पोलीस आयुक्त आणि मुख्यमंत्र्यांशीबी बोललो. त्यांनी सांगितलं की, यात कोणत्याही जाती-धर्माचा असो, त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे,' अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

घडवून आणलेली दंगल'ही घडवून आणलेली दंगल आहे, असा माझा आरोप आहे. बोलायचं एक आणि करायचं दुसरं, हे शहराच्या शांततेसाठी योग्य नाही. अंबादास दानवेंनी मूर्खासारख स्टेटमेंट करू नये. राम नवमी हिंदूंचा सण आहे आणि याच सणावेळी आम्ही घडनू आणू, हे अतिशय मूर्खपणाचे स्टेटमेंट आहे. तुम्हाला बोलायला येत नाही, तर बोलू नका. उगाच शहराची शांतता बिघडवण्याचा प्रयत्न नका करू. या घटनेत जो दोषी आहे, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. मग तो शिंदे गटाचा असो, ठाकरे गटाचा असो किंवा इतर कुणीही असो. ही राजकारण करण्याची वेळ नाही,' असंही संजय शिरसाट यावेळी म्हणाले.  

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSanjay Shirsatसंजय शिरसाटImtiaz Jalilइम्तियाज जलीलPoliceपोलिसMumbaiमुंबई