शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरवासीयांना आवडते भेंडी; दररोज फस्त करतात ५० क्विंटल भाजी

By प्रशांत तेलवाडकर | Updated: May 23, 2024 16:57 IST

छत्रपती संभाजीनगरात सध्या नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातून दररोज ४० ते ६० क्विंटल भेंडीची आवक होत आहे.

छत्रपती संभाजीनगर : पालेभाज्यांमध्ये ‘मेथी’ची भाजी सर्वाधिक विक्री होते, तसेच फळभाज्यांमध्ये ‘भेंडी’ची भाजी वर्षभर विकली जाते. कारण, शहरवासीय दररोज ५० क्विंटल भेंडीची भाजी फस्त करतात. एरव्ही लहान मुले भाजी खाण्यास नकार देतात; पण भेंडीची भाजी म्हटल्यावर जेवणासाठी चटकन तयार होतात. एवढेच नव्हे तर, शाळेत डब्बा घेऊन जातात तेव्हा बहुतांश विद्यार्थ्यांच्या डब्यात भेंडीची भाजी असतेच. यामुळे नवीन शैक्षणिक वर्ष ‘जून’मध्ये सुरू होईल तेव्हा भेंडीला अधिक मागणी वाढणार आहे.

इंग्रजीत लेडी फिंगरमराठी, हिंदी भाषेत ‘भेंडी’ची भाजी म्हटले जात असले तरी इंग्रजीत या भाजीला ‘लेडी फिंगर’ असे म्हटले जाते. कारण, बोटाच्या आकारासारखी ही भेंडी असल्याने तिला तसे म्हटले जाते.

कोणत्या जिल्ह्यातून येते भेंडी?महाराष्ट्रात ६००० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर भेंडीची लागवड केली जाते. तशी बहुतांश जिल्ह्यांत भेंडीची लागवड कमी-अधिक प्रमाणात केली जाते. त्यात पुणे, जळगाव, धुळे, अहमदनगर, नाशिक आणि सातारा या जिल्ह्यांत लागवड मोठ्या प्रमाणात होते. छत्रपती संभाजीनगरात सध्या नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातून दररोज ४० ते ६० क्विंटल भेंडीची आवक होत आहे.

भेंडीचे भाव वाढलेढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस व अतिउष्णता याचा परिणाम भेंडीच्या पिकावर होत आहे. परिणामी, ६० रुपये किलोने विक्री होणारी भेंडी मागील आठवड्यापासून ८० रुपये किलोने विकत आहे. भेंडी महाग झाली तरी उलाढालीवर परिणाम होत नाही.- संजय वाघमारे,भाजी विक्रेता

मधुमेहींसाठी आवर्जून खरेदी करतात भेंडीआबालवृद्ध भेंडीची भाजी आवडीने खातात; पण मधुमेहींसाठीही भेेंडी लाभदायक असल्याने तिची विक्री वाढण्याचे हे मोठे कारण आहे. भेंडीत लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम ही खनिजे असतात जी हाडे, हृदय मजबूत ठेवण्यास फायदेशीर असतात आणि रक्तदाब स्थिर ठेवण्यातही महत्त्वाची भूमिका बजावतात. उच्च प्रमाणात विरघळणारे फायबर जे रक्तातील शर्करा नियंत्रित करते, कोलेस्टेरॉल कमी करते. यामुळे मधुमेहींसाठी ही भाजी लाभदायक असल्याचे आहारतज्ज्ञांनी सांगितले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादvegetableभाज्याfoodअन्न