शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
2
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
3
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
4
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
5
बांग्लादेशात निवडणुकीचे बिगुल वाजले; 'या' तारखेला मतदान, मात्र शेख हसीनांच्या पक्षावर बंदी
6
तपोवनातील वृक्षतोडीविरोधात आता अण्णा हजारे मैदानात; विचारणा करत म्हणाले, “कुंभमेळा...”
7
“लाडक्या बहिणींना २१०० रुपये द्यावे, अन्यथा CM फडणवीसांनाच घरी बसावे लागेल”: उद्धव ठाकरे
8
शालेय सहलींसाठी STलाच उदंड प्रतिसाद; एका महिन्यात तब्बल २२४३ बस आरक्षित, १० कोटींची कमाई
9
अमित शाह यांनी '102 डिग्री' ताप असतानाही संसदेत 'मत चोरी'वर दिलं उत्तर, सभागृह सोडून गेले राहुल गांधी
10
IPL 2025 Auction : ‘छप्पर फाड’ कमाई करण्यासाठी परदेशी खेळाडूनं खेळला असा डाव; सगळेच झाले थक्क!
11
SDM नां केली मारहाण, ४ गर्लफ्रेंड, त्यापैकी ३ प्रेग्नंट, बोगस IAS चा प्रताप, कोण आहे तो?  
12
नवा ट्रेंड! स्किन केअरसाठी 'हे' खास ड्रिंक पीत आहेत Gen-Z; पण खरंच किती होतो फायदा?
13
देवेंद्र फडणवीसांनी 'पांघरूण खातं' सुरु करावं आणि त्याचं मंत्री व्हावं- उद्धव ठाकरे
14
दिल्ली दंगलीतील आरोपी उमर खालिदला दिलासा; न्यायालयाकडून जामीन मंजूर
15
उत्तर प्रदेशसह या ६ राज्यांमध्ये SIR साठीची मुदत वाढवली, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय  
16
"रोहित शर्मा मैदानात जेव्हा 'तसा' वागतो, ते खूप विचित्र वाटतं"; यशस्वी जैस्वाल अखेर बोललाच
17
“प्राचीन मंदिर पाडून RSSचे कार्यालय”; उद्धव ठाकरेंची अमित शाहांवर टीका, ‘तो’ फोटोही दाखवला
18
अण्णा हजारे पुन्हा उपोषणाला बसणार, सशक्त लोकायुक्तावरून राज्य सरकारला दिला असा इशारा...  
19
थंडीत फ्रीज बंद करणं पडू शकतं महागात; वीज वाचवण्याच्या नादात करू नका 'ही' चूक
20
Technology: सावधान! तुमच्या फोन स्क्रीनवरील 'हे' तीन रंगीत ठिपके देतात हॅकिंगची सूचना
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगर पोलिस आयुक्तांची अधिकाऱ्यांना दिवाळी भेट, पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 17:10 IST

बहुचर्चित गुन्हे शाखेच्या प्रभारी वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदी गजानन कल्याणकर यांची नियुक्ती

छत्रपती संभाजीनगर : दिवाळीच्या पूर्वसंध्येला पोलिस आयुक्तांनी पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करत काहींना दिवाळी भेट दिली. यात बहुचर्चित तसेच शहराची गुन्हेगारी नियंत्रित ठेवण्याची प्रमुख जबाबदारी असलेल्या गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदी गजानन कल्याणकर यांना नियुक्त करण्यात आले आहे. त्यांच्यासह शहरातील एकूण १५ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या असून, दोन निरीक्षकांचा तात्पुरता पदभार कायम ठेवण्यात आला आहे.

तत्कालिन पोलिस निरीक्षक संदीप गुरमे यांच्या बदलीनंतर गुन्हे शाखेचे प्रभारीपदी रिक्त झाले होते, तेव्हापासून अनेक अधिकाऱ्यांनी या पदासाठी मुंबईपर्यंत जोर लावला. त्याशिवाय, शहरातील महत्त्वाच्या ठाण्याचा पदभार मिळण्यासाठी अनेक इच्छुकांनी फिल्डिंग लावली होती. शुक्रवारी पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी अखेर या बदलीबाबत निर्णय घेत १५ पोलिस निरीक्षकांच्या बदलीचे आदेश जारी केले. यानंतर सहायक पाेलिस निरीक्षक, उपनिरीक्षकांची देखील खांदेपालट होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

अधिकारी - कोठून (पोलिस ठाणे /विभाग) - कुठे (पोलिस ठाणे /विभाग)गजानन कल्याणकर - एमआयडीसी सिडको - गुन्हे शाखागीता बागवडे - अमली पदार्थ प्रतिबंधक विभाग - एमआयडीसी सिडकोशिवचरण पांढरे - सायबर पोलिस ठाणे - वाळुजअतुल येरमे - उस्मानपुरा - सिडकोसोमनाथ जाधव - नियंत्रण कक्ष - सायबर पोलिस ठाणेसंग्राम ताटे - नियंत्रण कक्ष - उस्मानपुरासुनिता मिसाळ - हर्सुल - भरोसा सेलस्वाती केदार - विशेष शाखा - हर्सुलराजेंद्र सहाणे - वाळुज - पोलिस आयुक्त यांचे वाचकश्रीनिवास रोयलवाल - नियंत्रण कक्ष - सिटीचौक (दुय्यम निरीक्षक)तेजश्री पाचपुते - भरोसा सेल - नियंत्रण कक्षशिवाजी तावरे -नियंत्रण कक्ष - पोलिस कल्याणराजेश मयेकर - नियंत्रण कक्ष - एटीबी, एटीसीकुंदनकुमार वाघमारे - सिडको - नियंत्रण कक्षनरेंद्र पाडळकर - नियंत्रण कक्ष - विशेष शाखा (पासपोर्ट)

आघाव यांच्याकडे वाहतूकचा अतिरिक्त भारसद्या विशेष शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांच्याकडे सिडको वाहतूक शाखेच्या प्रभारीपदाचा अतिरिक्त पदभार सोपवण्यात आला आहे, तर काही दिवसांपासून तात्पुरता पदभार असलेल्या जवाहरनगर ठाण्याचे निरीक्षक सचिन कुंभार व जिन्सीचे शिवाजी बुधवंत यांना त्याच ठाण्यात पूर्णवेळ प्रभारीपद देण्यात आले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Chhatrapati Sambhajinagar Police Transfers: Diwali Gift for Inspectors

Web Summary : On Diwali eve, Chhatrapati Sambhajinagar's Police Commissioner transferred 15 police inspectors, including Gajanan Kalyankar to the Crime Branch. Several inspectors received new postings across various police stations and departments, while some got additional responsibilities.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरPoliceपोलिस