शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

शहर स्वच्छ ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या गृहप्रकल्पासाठी छत्रपती संभाजीनगर महापालिका देणार जागा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2024 19:19 IST

बांधकाम व्यावसायिकाने प्रकल्प उभारून द्यावा. त्यासाठी लागणारा खर्च कर्मचाऱ्यांनी कर्जाच्या माध्यमातून द्यावा, असे ठरले.

छत्रपती संभाजीनगर : शहर स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिकेचे दोन हजारांहून अधिक कर्मचारी पहाटे ४ वाजेपासून परिश्रम घेतात. त्यातील बहुतांश कर्मचाऱ्यांना हक्काचे घर नाही. आजही हे कर्मचारी विविध स्लममध्ये राहत आहेत. त्यांना चांगल्या ठिकाणी घर मिळावे, यासाठी मनपा प्रशासनाने पुढाकार घेतला आहे.

मनपा कर्मचाऱ्यांसाठी प्रशासनाने दिल्ली गेट, भडकल गेट, जकात नाका, सेव्हन हिल आदी ठिकाणी अत्यंत कमी प्रमाणात निवासस्थाने उभारली आहेत. यामध्ये बहुतांश ठिकाणी चतुर्थश्रेणी कर्मचारी आहेत. शिवाय अनेक स्वच्छता कर्मचारी गांधीनगर, हर्षनगर, लेबर कॉलनी, शहाबाजार, शताब्दीनगर, आंबेडकरनगर, घाटी परिसरात राहतात. स्वत:चे घर नसल्याने हे कर्मचारी भाड्याच्या घरात राहतात. त्यांना चांगले हक्काचे घर मिळावे, यासाठी मनपा अधिकारी-कर्मचारी संघटनेने मागील आठवड्यात प्रशासकांकडे मागणी केली. याची दखल घेत प्रशासक जी. श्रीकांत यांनी पुढाकार घेतला. गुरुवारी नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. सहसंचालक मनोज गर्जे यांना या प्रकल्पासाठी जमीन उपलब्ध करून देण्याची सूचना केली. मनपाला बांधकाम परवानगी देताना काही जागा ॲमिनिटीअंतर्गत प्राप्त होते, अशा जागांचा शोध घेऊन तेथे गृहप्रकल्प राबविण्यासंदर्भात चाचपणी करण्याचे आदेश दिले.

बांधकाम व्यावसायिक प्रकल्प उभारून देणारसफाई कामगार म्हणून किती कर्मचाऱ्यांना स्वत:ची घरे नाहीत, हे अगोदर तपासण्यात येईल. एकूण कर्मचारी किती, ज्यांना घरांची गरज आहे, हे निश्चित झाल्यावर पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे. गृहप्रकल्पासाठी जागा मनपाची राहील. बांधकाम व्यावसायिकाने प्रकल्प उभारून द्यावा. त्यासाठी लागणारा खर्च कर्मचाऱ्यांनी कर्जाच्या माध्यमातून द्यावा, असे ठरले.

२००५ मध्ये राबविली होती योजनामहापालिकेचे तत्कालीन आयुक्त असीमकुमार गुप्ता यांनी सफाई कर्मचाऱ्यांसाठी सातारा येथे दीड एकर जागेवर ६२ कर्मचाऱ्यांसाठी गृहप्रकल्प राबविला होता. अवघ्या अडीच लाख रुपयांना कर्मचाऱ्यांना घरे देण्यात आली होती. एका खासगी बँकेकडून कर्ज दिले होते. आज या रो-हाऊसची किंमत १५ ते १८ लाख झाली. काही कर्मचाऱ्यांनी आज त्याच जागेवर दोन ते तीन मजले बांधले आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका