शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

महापालिका ‘वसुली’त चक्क फेल; ३५० कोटींचे उद्दिष्ट, जमा झाले फक्त १५५ कोटी

By मुजीब देवणीकर | Updated: March 20, 2024 19:15 IST

मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी यंदा मालमत्ता कर, पाणीपट्टी वसुलीसाठी जीएसटी विभागातील अनुभवी अधिकाऱ्यांची मदत घेतली.

छत्रपती संभाजीनगर : मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुलीतून यंदा ३५० कोटी रुपये मनपाच्या तिजोरीत येतील, अशी अपेक्षा होती. ३१ मार्चला अजून १२ दिवस शिल्लक आहेत. सोमवारपर्यंत मालमत्ता करातून १३२ कोटी ४६ लाख, तर पाणीपट्टीच्या माध्यमाने २२ कोटी ४७ लाख रुपये, असे एकूण १५४ कोटी ९३ लाख रुपये वसूल झाले आहेत. पुढील १२ दिवसांत मनपा किती वसुली करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी यंदा मालमत्ता कर, पाणीपट्टी वसुलीसाठी जीएसटी विभागातील अनुभवी अधिकाऱ्यांची मदत घेतली. त्यामुळे वसुलीचा आकडा मार्चपर्यंत मोठा असेल, असा अंदाज वर्तविला जात होता. मागील वर्षाच्या तुलनेत वसुली थोडी जास्त आहे. करमूल्य निर्धारण अधिकारी अपर्णा थेटे यांनी झोननिहाय बैठका घेतल्या. गुगल शिटवर वसुलीची व्यवस्था करून दिली. वसुली न करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगारही कापण्यात आला. मनपाच्या इतिहासात प्रथमच थकबाकीदारांना जप्तीच्या नोटिसासुद्धा बजावण्यात आल्या. मालमत्ता कर आणि पाणीपट्टीची वसुली १५५ कोटींवर पोहोचली आहे.

आतापर्यंतच्या वसुलीचा आलेख (आकडे कोटीत)वर्षे ------------मालमत्ता कर------- पाणीपट्टी२०१८-१९------ १०९.७९-----------२६.२६२०१९-२०-------११५.३७-----------२९.२९२०२०-२१-------१०७.७६-----------२९.०६२०२१-२२------१२९.५९-----------३७.५३२०२२-२३-----११५.०७----------२५.८२ २०२३-२४-----१३२.४६----------२२.२२ (आजपर्यंत)

झोननिहाय वसुलीचा आलेखझोन --------- मालमत्ता कर-------- पाणीपट्टी---------------- एकूण (कोटी)एक --------- १२.४९---- ---------- १.४६--------------- १३.९५दोन ---------- ११.९३-------------- १.६८-------------- १३.६१तीन---------- ०४.८६-------------- १.१९--------------- ०६.०५चार----------- १२.४१------------ ३.७०----------------- १६.११पाच----------- १८.५६------------ ३.१४------------------ २१.७०सहा----------- ०९.७८------------ २.३३------------------ १२.११सात----------- २१.७८------------ ३.९३------------------ २५.७१ आठ---------- २४.७२------------- ०.७४------------------- २४.९६ नऊ---------- १६.३८-------------- ४.३०------------------- २०.६८दहा --------- ००.०५-------------- ००.०० ------------------ ००.०५एकूण---------१३२.४६----------- २२.४७ ----------------- १५४.९३

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाTaxकर