छत्रपती संभाजीनगर : सातारा गावातील केेंद्रीय प्राथमिक विद्यालय परिसरातील मोडकळीस आलेल्या पत्र्याच्या चार खोल्यांमध्ये सुरू असलेल्या अवैध गर्भपाताच्या काळ्या उद्योगाचे मनपा आरोग्य विभाग आणि सातारा पोलिसांनी रविवारी सहा तासांहून अधिक वेळ नेमकी कारवाई करीत बिंग फोडले. दुपारी ३ वाजेपासून रात्री ९ वाजेपर्यंत पूर्ण प्रकरणाचा मनपा व पोलिसांनी छडा लावत दोन महिलांना ताब्यात घेतले. वर्षा जाधव आणि ज्योती पवार अशी ताब्यात घेतलेल्या महिलांची नावे आहेत. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सातारा पोलिस ठाण्यात सुरू होती.
मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा आणि सातारा पोलिस ठाण्यातील पीएसआय निर्मल राख यांच्या नेतृत्वात स्त्रीभ्रूण हत्येचा काळ्या धंदा उघडकीस आणण्यात आला.सातारा परिसरात अवैधरीत्या गर्भपात होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर रविवारी दुपारी ३ वाजता पथकाने संयुक्तपणे सातारा गावातील ते घर गाठले. तेथे एका महिलेला गर्भपाताच्या गोळ्या देण्यात आल्या होत्या. तिला प्रचंड वेदना सुरू होत्या. पथकाने तातडीने त्या महिलेला घाटीमध्ये दाखल केले. तिला तिच्या नवऱ्याने या ठिकाणी आणून सोडल्याची प्राथमिक माहिती असल्याचे डॉ. मंडलेचा यांनी सांगितले.
सोनाग्राफी बाहेरून, गर्भपात ‘त्या’ घरात....डॉ. मंडलेचा यांनी सांगितले, जीएनएमचा कोर्स केलेल्या वर्षा जाधव व ज्याेती पवार या पत्र्याच्या घरामध्ये अवैधरीत्या गर्भपात करत होत्या. गर्भपातासाठी पेशंट आणून देण्यासाठी वर्षाची बहीण तिला मदत करत असावी. वर्षा पेशंटला गर्भपाताच्या गोळ्या द्यायची. ज्योती इतर साहित्य आणायची. डाॅक्टरकडून सोनाग्राफी केली जात होती की इतर तंत्रज्ञाकडून, याची प्राथमिक माहिती समोर येईल. सोनोग्राफीत मुलीचा गर्भ असल्यानंतर पेशंटला वर्षा व ज्याेतीकडे आणण्यासाठी वर्षाची बहीण त्यांना मदत करायची. त्यानंतर येथे गर्भपात केला जात असे.
गोळ्यांचे ११ पाकिटे जप्त...त्या खोल्यांमधून गर्भपातासाठी वापरण्यात येणाऱ्या गोळ्यांचे ११ पाकीट पोलिस व मनपा पथकाने जप्त केल्या आहेत. त्यातील चार ते पाच पाकीट वापरलेले आढळल्याने मागील काही दिवसांत गर्भपातासाठी काही महिला येथे येऊन गेल्याची शक्यता पथकाने वर्तविली.
एफडीएमुळे अडकून पडले पथक....गोळ्यांचे पाकीट दुपारी २ वा. सापडले. पीएसआय राख व डॉ. मंडलेचा यांनी एफडीएला पंचनामा करण्यासाठी तातडीने माहिती दिली. परंतु, रात्री ८ वा. एफडीएचे ड्रग इन्स्पेक्टर घटनास्थळी दाखल झाले. तेथून पुढे त्या गोळ्या सील करण्याची कारवाई सुरू झाली. एफडीएचे इन्स्पेक्टर वेळेत न आल्यामुळे पाेलिस व मनपाचे २० कर्मचारी सहा तास अडकून होते.
‘त्या’ महिलेचा घाटीत गर्भपात...सातारा गावातील घटनास्थळी गर्भपात होण्यासाठी गोळ्या दिलेल्या महिलेला पथकाने अत्यावस्थेत घाटीत दाखल केले. दोन ते तीन तासानंतर तिचा घाटीत गर्भपात झाला. तिची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती स्त्रीरोग प्रसूतिशास्त्र विभाग प्रमुख डॉ. श्रीनिवास गडप्पा यांनी दिली.
Web Summary : Police exposed an illegal abortion racket in Chhatrapati Sambhajinagar. Two women were arrested for administering abortion pills in a dilapidated house. Authorities seized abortion pills; a patient was hospitalized. FDA delay hampered the investigation.
Web Summary : छत्रपति संभाजीनगर में पुलिस ने एक जर्जर घर में चल रहे अवैध गर्भपात रैकेट का भंडाफोड़ किया। दो महिलाओं को गर्भपात की गोलियां देने के आरोप में गिरफ्तार किया गया। अधिकारियों ने गर्भपात की गोलियां जब्त कीं; एक मरीज को अस्पताल में भर्ती कराया गया। एफडीए की देरी से जांच में बाधा आई।