छत्रपती संभाजीनगर : शहराला आजपर्यंत २२ महापौर लाभले. त्यात ७ महिला महापौरांचा समावेश आहे. जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात शहराला २३ वे महापौर प्राप्त होतील. महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत आणखी निघालेली नाही. १५ जानेवारीपूर्वी सोडत निघेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. महापौरपद यंदा खुल्या प्रवर्गासाठी असेल का? किंवा आरक्षण असेल, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
शहराचे प्रथम नागरिक म्हणजे महापौर होय. या पदावर बसण्याची संधी फार कमी नगरसेवकांना प्राप्त होते. नियमानुसार अडीच वर्षांचा कार्यकाल महापौरपदाचा असतो. अलीकडे राजकीय पक्षांनी विविध नगरसेवकांना हा मान मिळावा, या दृष्टीने एक ते सव्वा वर्षांचा कार्यकाल केला होता. २०१५ ते २०२० या पंचवार्षिकमध्ये तीन जणांना संधी देण्यात आली. २०१० ते २०१५ मध्ये फक्त दोन जणांना संधी मिळाली. २००५ ते २०१० या पाच वर्षांमध्ये तीन जण महापौर पदावर बसले. शहराच्या पहिल्या महिला महापौर म्हणून सुनंदा कोल्हे यांना १९९५ मध्ये संधी देण्यात आली होती. पहिले महापौर १९८८ मध्ये शांताराम काळे होते.
आरक्षण सोडतीकडे लक्ष१९८८ पासून आजपर्यंत महापालिकेच्या एकूण सहा सार्वत्रिक निवडणुका झाल्या. सातवी निवडणूक आता जानेवारी महिन्यात घेण्यात येत आहे. १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारी रोजी मत मोजणी होईल. त्यानंतर नवनियुक्त ११५ पैकी बहुमत असलेल्या पक्षातील नगरसेवकांना महापौरपदाचे वेध लागतील. यंदाचे महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी की आरक्षित राहील, हे अद्याप जाहीर झालेले नाही. महापौरपदासाठी आरक्षण सोडत राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडून काढण्यात येईल. या सोडतीकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत.
आजपर्यंतचे महापौर, कार्यकाळनाव--------------------------कार्यकाळशांताराम काळे--------------१७-५-१९८८ ते ५-७-१९८९मोरेश्वर सावे------------------५-७-१९८९ ते १९-५-१९९०प्रदीप जैस्वाल----------------१९-५-१९९० ते १३-५-१९९१मनमोहनसिंग ओबेरॉय-------१३-५-१९९१ ते २८-५-१९९२अशोक सायन्ना यादव---------१८-५-१९९२ ते ३०-४-१९९३सुनंदा कोल्हे------------------१९-४-१९९५ ते १८-४-१९९६गजानन बारवाल--------------१८-४-१९९६ ते ७-५-१९९७अब्दुल रशीद खान (मामू)----७-५-१९९७ ते २०-४-१९९८शिला गुंजाळ------------------२०-४-१९९८ ते २०-४-१९९९सुदाम सोनवणे----------------२०-४-१९९९- ते २९-४-२०००डॉ. भागवत कराड-----------२९-४-२००० ते ३१-७-२००१विकास जैन------------------४-९-२००१ ते २९-१०-२००२विमल राजपुत---------------२९-१०-२००२ते ३-२-२००४रुख्मिणी शिंदे---------------१२-२-२००४ ते २९-४-२००५किशनचंद तनवाणी---------२९-४-२००५ ते ४-११-२००६डॉ. भागवत कराड-----------१४-११-२००६ ते २९-१०-२००७विजया रहाटकर------------२९-१०-२००७ ते २८-४-२०१०अनिता घोडेले--------------२९-४-२०१० ते २८-१०-२०१२कला ओझा-----------------२९-१०-२०१२ ते २८-४-२०१५त्र्यंबक तुपे-----------------२९-४-२०१५ ते ३०-११-२०१६भगवान घडमोडे----------१४-१२-२०१६ ते २८-१०-२०१७नंदकुमार घोडेले-----------२९-१०-२०१७ ते २०-४-२०२०
Web Summary : Chhatrapati Sambhajinagar awaits its 23rd mayor, with seven women previously holding the post. The upcoming election's reservation status is keenly anticipated before January 15th. The city has had six elections since 1988, with the seventh slated for January. All eyes are on the upcoming reservation announcement.
Web Summary : छत्रपति संभाजीनगर को अपने 23वें महापौर का इंतजार है, पहले सात महिलाएं इस पद पर रह चुकी हैं। आगामी चुनाव की आरक्षण स्थिति का 15 जनवरी से पहले बेसब्री से इंतजार है। शहर में 1988 से छह चुनाव हुए हैं, सातवां जनवरी में होने वाला है। सबकी निगाहें आगामी आरक्षण घोषणा पर टिकी हैं।