शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगर फ्लॅशबॅक २०१५: युतीत शिवसेना होता सर्वांत मोठा पक्ष, दुसऱ्यास्थानी MIM

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 17:54 IST

शिवसेना-भाजप युतीने काही अपक्षांच्या मदतीने बहुमताचा ५८ आकडा पार करीत पाच वर्षे मनपावर राज्य केले होते.

छत्रपती संभाजीनगर : शिवसेना-भाजप युतीने २०१५ मध्ये युतीत निवडणूक लढली होती. २८ उमेदवार निवडून आणत शिवसेना सर्वांत मोठा पक्ष ठरला होता. दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष होता एमआयएम. या पक्षाचे तब्बल २४ नगरसेवक निवडून आले होते. विशेष बाब म्हणजे, या पक्षाने शहरात महापालिकेची पहिलीच निवडणूक लढली होती. भाजपला २३ जागांवर समाधान मानावे लागले होते. शिवसेना-भाजप युतीने काही अपक्षांच्या मदतीने बहुमताचा ५८ आकडा पार करीत पाच वर्षे मनपावर राज्य केले होते.

मागील काही वर्षांत राजकीय परिस्थिती बदलली. शिवसेनेत फूट पडून शिंदेसेना आणि उद्धवसेना असे दोन पक्ष झाले. उद्धवसेनेतील अनेक माजी महापौर, नगरसेवक शिंदेसेनेत गेले. भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार यांची महायुती आहे. विरुद्ध दिशेला काँग्रेस, उद्धवसेना आणि राष्ट्रवादी शरद पवार हे तीन पक्ष महाविकास आघाडीत आहेत. मात्र, दोघांमध्ये अद्याप मनपा निवडणुकीसाठी युती-आघाडीची घोषणा झालेली नाही. युतीसंदर्भात सर्वच राजकीय पक्ष एकमेकांसोबत चर्चा करीत आहेत. महापालिका निवडणुकीसाठी घोषणा होताच युतीसंदर्भात राजकीय पक्षांच्या जोरबैठका वाढणार, हे निश्चित!

२०१५ चे पक्षीय बलाबलशिवसेना- २८भाजप- २३एमआयएम-२४काँग्रेस-१२अपक्ष-१८बीएसपी-०४राष्ट्रवादी काँग्रेस-०४रिपाइं (डी.)- ०२एकूण -११५

असे आहे आरक्षणओबीसीसाठी ३१ जागा, त्यामध्ये १६ महिलांचा समावेश आहे. एसटी प्रवर्गासाठी २, त्यात एक महिला, एससी प्रवर्गासाठी २२ जागा आहे. त्यात ११ महिलांसाठी आरक्षित आहेत. सर्वसाधारण महिलांसाठी ३० जागा आहेत. मनपात एकूण ५५ जागा आरक्षित आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Chhatrapati Sambhajinagar 2015: Shiv Sena Dominant, MIM Second, Alliances Uncertain.

Web Summary : In 2015, Shiv Sena led in Sambhajinagar, followed by MIM. Alliances are shifting with splits in Shiv Sena. Current political landscape sees various parties in discussions for upcoming municipal elections. Alliances remain uncertain.
टॅग्स :Municipal Corporationनगर पालिकाChhatrapati Sambhaji Nagar Municipal Corporation Electionछत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक २०२६Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा