शहरं
Join us  
Trending Stories
1
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
2
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
3
तुमच्या जुन्या बँक खात्यात पैसे विसरलात का? RBI ने सांगितला फक्त ३ स्टेप्सचा सोपा मार्ग
4
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
5
नात्याला काळीमा ! दीराने वहिनीचे दोन्ही हात पकडून ठेवले अन् पतीने कापला गळा...
6
AUS vs IND 3rd T20I : संजू संघातून ‘आउट’; टॉसवेळी सूर्याचं मिचेल मार्शसमोर भन्नाट सेलिब्रेशन!
7
उद्धव ठाकरेंचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, शेतकऱ्यांशी साधणार संवाद
8
'ट्रॅजेडी क्वीन' मीना कुमारीवर बायोपिक येणार, क्रिती सेननचा पत्ता कट; 'ही' अभिनेत्री फायनल?
9
भाग्यवान! ११ वर्षांच्या मुलाचं अचानक 'असं' फळफळलं नशीब, रातोरात झाला करोडपती
10
डोक्यात रॉड मारून मोठ्या भावाची हत्या, मग गर्भवती वहिनीवर बलात्कार, नंतर तिलाही संपवलं...
11
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
12
५,८०० कोटींच्या २००० रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडे पडून! अजूनही बदलण्याची संधी
13
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: महादेव पूजनासह ‘या’ ७ गोष्टी आवर्जून करा; काही कमी पडणार नाही!
14
तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात होणार दर्शन मंडप; वारकऱ्यांना मिळणार कमी वेळेत विठ्ठलाचे दर्शन
15
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा!
16
King Title Reveal: वाढदिवशी शाहरुखचं चाहत्यांना सरप्राईज! 'किंग'चा पहिला प्रोमो रिलीज, व्हिडीओ बघाच
17
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
18
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी
19
"लेकाच्या कठीण प्रसंगी देश विरोधात असताना...", शाहरुखबद्दल हिमानी शिवपुरी काय म्हणाल्या?
20
९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video

जिल्हाधिकाऱ्यांचा महसुली यंत्रणेवरच 'सर्जिकल स्टाइक'; लेटलतीफ १३४ जणांचा पगार कापणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 13:14 IST

कार्यालयात येण्याची वेळ संपताच जिल्हाधिकाऱ्यांनी प्रथम कार्यालयांचे दरवाजे बंद केले. मग कर्मचारी किती वाजता येतात, हे पाहण्यासाठी त्यांनी पायऱ्यांवरच खुर्ची टाकून ठिय्या दिला.

छत्रपती संभाजीनगर : किरकोळ कामांसाठी थेट जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना नागरिकांचे वारंवार फोन येण्याचे प्रमाण वाढल्याने त्यांनी ९ तालुक्यांमध्ये प्रमुख अधिकाऱ्यांचे पथक नेमून तहसीलनिहाय यंत्रणेचे शुक्रवारी ‘सर्जिकल स्टाइक’ केले. जिल्हाधिकारी स्वत: फुलंब्री तहसीलच्या पायरीवर सकाळी ०९:०० वाजेलाच जाऊन बसले होते. जिल्हाधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शुक्रवारी केलेल्या कार्यालयांच्या झाडाझडती १८८ पैकी तब्बल १३४ कर्मचारी वेळेत न आल्याचे आढळले. या लेटलतीफ आणि गैरहजर कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, तसेच याची नोंदही सर्व्हिस बूकला घेण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या ‘सर्जिकल स्टाइकमुळे’ प्रशासनात खळबळ उडाली.

पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी पैठण, उपजिल्हाधिकारी नीलेश अपार यांनी गंगापूर, अपर जिल्हाधिकारी संभाजी अडकुणे यांनी वैजापूर, उपजिल्हाधिकारी एकनाथ बंगाळे यांनी सोयगाव, उपजिल्हाधिकारी सुचिता शिंदे यांनी खुलताबाद, उपजिल्हाधिकारी उमाकांत पारधी यांनी सिल्लोड, तर उपजिल्हाधिकारी संगीता राठोड यांनी अपर तहसील कार्यालय आणि छत्रपती संभाजीनगर ग्रामीण तहसील कार्यालयात जाऊन झाडाझडती घेतली. पैठण येथील १ आणि खुलताबाद येथील ३, असे ४ जण रजेवर असल्याचे आढळून आले. जिल्हाधिकाऱ्यांनी रात्रीच अधिकाऱ्यांना तपासणीचे निर्देश दिले होते. ऑनलाइन हजेरी यंत्रणा बंद असल्यामुळे कर्मचारी वेळेत येत नसल्याचे निदर्शनास आले.

जिल्हाधिकारी तासभर बसले पायरीवरजिल्हाधिकारी सकाळी ०९:४५ वाजताच फुलंब्री तहसील कार्यालयात गोपनीयरीत्या पोहोचले. या इमारतीमध्ये तहसील, भूमी अभिलेख, दारूबंदी, कृषी कार्यालय, पुरवठा विभाग, कोषागार, सहकार विभाग आदी सात विभागांचे कार्यालय आहे. कार्यालयात येण्याची वेळ संपताच जिल्हाधिकाऱ्यांनी प्रथम त्या कार्यालयांचे दरवाजे बंद केले. मग कर्मचारी किती वाजता येतात, हे पाहण्यासाठी त्यांनी पायऱ्यांवरच खुर्ची टाकून ठिय्या दिला. जिल्हाधिकारी कर्मचाऱ्यांची वाट पाहत असताना १०:०० वाजेच्या आत केवळ नायब तहसीलदार संजीव राऊत यांच्यासह आणखी दोन कर्मचारी वेळेवर पोहोचले. अनेक जण गैरहजर होते. बाकीचे एक- एक करून येत होते. उशिरा आलेल्या कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी उशिराचे कारण विचारले. मात्र, त्यांना उत्तर देता आली नाही. जिल्हाधिकाऱ्यांना समोर पाहून उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली. काहींनी माफी मागण्याचाही प्रयत्न केला. तहसील कार्यालयातील १६ पैकी ३ कर्मचारी १०:०० वाजेच्या आत पोहोचले, तर पंचायत समितीमधील ४५ पैकी केवळ १० कर्मचारी वेळेवर आले होते.

सोयगावच्या तहसीलदार मनीषा मेने याच नियमित गैरहजर राहत असल्याची तक्रार भाजपचे शहराध्यक्ष योगेश पाटील यांनी तपासणीसाठी आलेले अधिकारी बंगाळे यांच्याकडे केली. यासंदर्भातील लेखी निवेदन पाटील यांनी दिले.

तालुका..... कर्मचारी.... उपस्थित..... गैरहजरफुलंब्री..... १६............. २................१४पैठण...... २२........... ९..................१२गंगापूर....३०............ ४................२६वैजापूर.........२०........ ९..............११सोयगाव...........१५......... ७..........८खुलताबाद..........२१............२......१९छत्रपत्री संभाजीनगर (ग्रामीण)..... २५.... ६....... १९छत्रपत्री संभाजीनगर..... ६......२....... ४एकूण...............१८८.......... ५३...........१३४

एक दिवसाचे वेतन कपात..ग्रामीण भागातील नागरिक आपल्या कामांसाठी महसूल कार्यालयात येतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी दिलेेल्या वेळेत येणे अपेक्षित आहे. उशिरा येणाऱ्या आणि गैरहजर असलल्या कर्मचाऱ्यांना नोटिसा देऊन त्यांच्याकडून खुलासा मागविण्याचे निर्देश दिले आहेत, तसेच या कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करून त्याची नोंद सर्व्हिस बूकला घेण्याचे सांगितले आहे. कर्मचाऱ्यांमध्ये सुधारणा झाली नाही, तर निलंबनाचीही कार्यवाही केली जाईल,-दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरRevenue Departmentमहसूल विभागcollectorजिल्हाधिकारी