जायकवाडी (पैठण): पैठण तालुक्यातील बालानगर शिवारात एका शेतकऱ्याचा खून झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणाचा अवघ्या २४ तासांत छडा लावत एमआयडीसी पैठण पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. किरकोळ वादातून मित्रानेच डोक्यात दगड घालून ही हत्या केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.
नेमका प्रकार काय?अहमद जाफर पठाण (वय ६०, रा. बालानगर) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. सोमवारी (दि. २३) सकाळी त्यांचा मृतदेह स्वतःच्या शेतात आढळून आला होता. अहमद हे रविवारी दुपारपासून घरातून बेपत्ता होते. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत श्वानपथक आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या मदतीने तपासाची चक्रे फिरवली.
असा उलगडला हत्येचा गुन्हातपासादरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की, रविवारी रात्री अहमद पठाण हे आरोपी केशवराव चव्हाण (रा. डोणगाव तांडा) याच्यासोबत शेतात मद्यपान करत होते. मद्यप्राशन सुरू असताना अहमद पठाण यांनी आरोपीच्या उजव्या हाताच्या बोटाला जोराने चावा घेतला. यामुळे संतापलेल्या केशवराव चव्हाण याने जवळच पडलेला दगड उचलून अहमद यांच्या कपाळावर जोराने मारला. या भीषण जखमेमुळे अहमद यांचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांची जोरदार कामगिरीसहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी दोन पथके तयार केली होती. बालानगर, डोणगाव तांडा आणि मुकुंदवाडी परिसरात शोधमोहीम राबवून आरोपी केशवराव चव्हाण याला ताब्यात घेण्यात आले. या कारवाईमुळे पैठण परिसरात पोलिसांचे कौतुक होत आहे. ही कारवाई सपोनि ईश्वर जगदाळे, उपनिरीक्षक कविता जगताप आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पूर्ण केली.
Web Summary : Paithan farmer Ahmed Pathan murdered. Friend Keshav Chavan arrested for killing Pathan with a stone after a drunken argument and biting incident. Police swiftly solved the case.
Web Summary : पैठण में किसान अहमद पठान की हत्या। नशे में बहस और काटने की घटना के बाद दोस्त केशव चव्हाण ने पत्थर से मारकर पठान की हत्या की। पुलिस ने तुरंत मामला सुलझाया।