शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

एजन्सीवर रांगा अन् साठेबाजाच्या शेडमध्ये ६९ सिलिंडर! छत्रपती संभाजीनगरात मोठी कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 13:50 IST

पत्र्याच्या शेडमध्ये गॅसचा काळाबाजार! रिकाम्या टाक्या भरण्यासाठी मोटार आणि वजनकाटा जप्त; शेख मुख्तारला पोलीस कोठडी

छत्रपती संभाजीनगर : एकीकडे शहरात सिलिंडरचा तुटवडा जाणवत असताना बेकायदेशररीत्या साठा करून ठेवणाऱ्यावर अन्न पुरवठा विभागाने कारवाई करत ताब्यात घेतले. शेख मुख्तार शेख उस्मान (५२, रा. पीरबाजार, उस्मानपुरा) असे संशयिताचे नाव असून, जवाहरनगर पोलिसांनी त्याला अटक केली.

आंतरराष्ट्रीय पातळीवरील तणाव व युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन, गॅस पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला. गेल्या वीस दिवसांपासून शहरात व्यावसायिक सिलिंडरचा तुटवडा असताना घरगुती गॅस सिलिंडरच्या तुटवड्याच्या भीतीने नागरिकांची गॅस एजन्सीवरवर रांगा लागल्या होत्या. काही ठिकाणी प्रतीक्षा यादी वाढल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत. परिस्थिती गंभीर वळणावर जात असल्याने जिल्हा प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली. शासनाने साठेबाजी व काळाबाजार रोखण्यासाठी कडक सूचना देत अन्न व नागरी पुरवठा विभागाला जीवनावश्यक वस्तूंचा कृत्रिम तुटवडा निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

पत्र्याच्या शेडमध्ये ठेवले सिलिंडरअन्न व नागरी पुरवठा विभागाला पीरबाजारात शेख मुख्तारने सिलिंडरचा साठा करून ठेवल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यानंतर अन्न धान्य वितरण अधिकारी भारती वाकोडे यांनी जवाहरनगर ठाण्याचे पोलिस निरीक्षक मारोती खिल्लारे, सहायक निरीक्षक अतिष लोहकरे, उपनिरीक्षक मारोती खिल्लारे यांच्या सहकाऱ्याने छापा टाकला. मुख्तारने नाल्याच्या कडेला उभारलेल्या पत्र्याचे शेडमध्ये व्यावसायिक ४५, तर घरगुती २४ सिलिंडर आढळले. त्याशिवाय रिकाम्या टाक्यांमध्ये गॅस भरण्यासाठी वजन काटा, मोटारदेखील मिळून आली. त्याच्यावर अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ कलम ३ व ७ सह कलम बीएनएस २८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला एक दिवसांची पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्याचे सहायक निरीक्षक अतिष लाेहकरे यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Black Marketer Hoards 69 Cylinders; Action Taken in Sambhajinagar

Web Summary : Amidst cylinder shortages, a black marketer in Sambhajinagar was arrested for hoarding 69 cylinders. Food Supply Department seized the cylinders from a shed. The accused faces charges under the Essential Commodities Act. Police investigation is underway.
टॅग्स :LPG Gas Crisisएलपीजी गॅस टंचाईchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर