शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

चिकलठाणा ते वाळूज १८ किमी उड्डाणपुलाची घोषणा; अर्थसंकल्पात मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 16:02 IST

चिकलठाणा ते वाळूज उड्डाणपुलाचा मार्ग मोकळा; अर्थसंकल्पातील घोषणेमुळे जालना रोडचे भाग्य उजळणार

छत्रपती संभाजीनगर : चिकलठाणा येथील विमानतळ ते वाळूज एमआयडीसीपर्यंत उड्डाणपुलाचे काम दोन टप्प्यात करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी राज्याच्या अर्थसंकल्पात केली.

२४ एप्रिल २०२२ रोजी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रकल्पाची घोषणा एनएचएआयमार्फत केली होती. त्यासाठी मनपाने एका संस्थेकडून कोट्यवधी रुपये खर्चून डीपीआर तयार करून घेतला; परंतु काही कारणास्तव रखडलेल्या या प्रकल्पाची घोषणा राज्य शासनाने केली आहे. महापालिकेच्या जाहीरनाम्याने भाजपने या प्रकल्पाचा अंतर्भाव केला होता. ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे म्हणाले, उन्नत मार्ग म्हणजेच उड्डाणपुलाची ती घोषणा आहे. येत्या काळात त्यासाठी तांत्रिक बाबींची जुळवाजुळव होईल. जालना रोडवरील वाहतूक कमी करण्याससह वाळूज आणि शेंद्रा एमआयडीसी कनेक्ट होण्यासाठी या पुलाचा मोठा वाटा असू शकेल.

किमान २ हजार कोटींचा प्रकल्पसंबंधित उड्डाणपूल बांधणीसाठी किमान २ हजार कोटींचा खर्च लागेल. पुलाची उंची, फोर लेन, सिंगल पिलर की डबल पिलर, लँडिंग, आऊटलेट याच्या डिझाइनवर सगळ्या खर्चाच्या बाबी अवलंबून आहेत. अहिल्यानगरमधील उड्डाणपुलाचा खर्च साधारणत: प्रतिकिमी ९० कोटींपर्यंत गेला आहे. त्याच धर्तीवर चिकलठाणा ते वाळूजपर्यंतच्या सुमारे १८ किमीपर्यंतच्या पुलास २ हजार कोटीचा निधी लागणे अपेक्षित आहे.

तीन वर्षांपूर्वीच्या डीपीआरमध्ये काय होते?शेंद्रा एमआयडीसी ते वाळूज एमआयडीसीपर्यंत २५ किमी अंतरात डबलडेकर पूल म्हणजे खाली रस्ता, वर पूल व मेट्रो असा प्रस्ताव पहिला डीपीआर होता. यात उड्डाणपूल १६ किमी चौपदरी आणि ९ किमीच्या डबलडेकर पुलाचा समावेश होता. त्यात शेंद्रा एमआयडीसी ते चिकलठाणा या चौपदरी उड्डाणपुलाची लांबी साडेसात किमी होती.

नवीन घोषणेत काय आहे?चिकलठाणा ते क्रांती चौक मार्गे वाळूज एमआयडीसीपर्यंत १८ किमीचा चौपदरी उड्डाणपूल असू शकेल. परंतु, नवीन घोषणेत विमानतळ ते वाळूजपर्यंत उन्नत मार्ग करण्याची घोषणा आहे. यासाठी डीपीआर, खर्च याबाबी अद्याप समोर आलेल्या नाहीत.

निवडणुकीच्या जाहीरनाम्यात भाजपचा शब्दजालना रोडवर भुयारी मार्ग आणि उड्डाणपूल उभारण्याचा शब्द भाजपने मनपा निवडणूक जाहीरनाम्यात दिला होता. रोडच्या उत्तर व दक्षिण या भागांची कनेक्टिव्हिटी वाढविण्याच्या दृष्टीने भुयारी मार्ग, उड्डाणपुलाची गरज असणार आहे. यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचा शब्द भाजपने दिला होता. चिकलठाणा ते वाळूजपर्यंत एक्सलग फ्लायओव्हर करण्यासह शेंद्रा ते वाळूज व बिडकीन ते हर्सूल निओ मेट्राेच्या सुविधेसाठी प्रयत्न करणार असल्याचे भाजप जाहीरनाम्यात म्हटले हाेते.

English
हिंदी सारांश
Web Title : Chikalthana to Waluj 18km Flyover Announced; CM's Major Budget Decision

Web Summary : Maharashtra government approves Chikalthana-Waluj 18km flyover project in two phases. The project aims to improve connectivity between Waluj and Shendra MIDC, reducing traffic. Estimated cost is ₹2,000 crore. Previous plans included double-decker bridges and metro lines. BJP promised the flyover in its manifesto.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरJalanaजालनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसWaluj MIDCवाळूज एमआयडीसी