शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगर शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांबरोबरच; जिल्हाध्यक्ष नॉट रिचेबल!

By स. सो. खंडाळकर | Updated: July 4, 2023 13:14 IST

स्वत: सुप्रिया सुळे व जयंत पाटील यांचे अनेकांना वैयक्तिक फोन

छत्रपती संभाजीनगर : शहर राष्ट्रवादी काँग्रेसशरद पवारांबरोबरच राहणार असल्याचे सोमवारी शहराध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन यांनी जाहीर केले. तर जिल्हाध्यक्ष कैलास पाटील हे कालपासूनच नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे त्यांची नेमकी भूमिका काय हे समजू शकले नाही. दरम्यान, सोमवारी शहरातल्या अनेक कार्यकर्त्यांना स्वत: सुप्रिया सुळे यांनी मोबाईलद्वारे संकर्प साधून त्यांचा कल जाणून घेतला. कालपासून स्वत: जयंत पाटीलही अनेकांना मोबाईल करीत आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार प्रा. किशोर पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आम्ही मरेपर्यंत शरद पवार यांच्यासोबतच राहणार आहोत. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये ५ जुलै रोजी आयोजित बैठकीचे निमंत्रण आम्हालाही आहे. मी, द्वारकाभाऊ पाथ्रीकर व विजयअण्णा बोराडे सर्व जण या बैठकीस उपस्थित राहणार आहोत.

मी सोमवारी दिवसभर कन्नड मतदार संघात होतो. कार्यकर्ते आणि सामान्य माणसांमध्ये शरद पवार यांच्याबद्दलची आस्था बघावयास मिळाली, असेही प्रा. पाटील यांनी नमूद केले. माजी खासदार जयसिंगकाका गायकवाड म्हणाले, शरद पवार एके शरद पवार. आमचा दुसरा कुणी नेता नाही.राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पहिले जिल्हाध्यक्ष सुधाकर सोनवणे आपली प्रतिक्रिया नोंदवताना म्हणाले, आम्ही शरद पवार यांचे निष्ठावान आहोत. अजित पवार यांची गद्दारी लोकांना मान्य नाही. राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षा छाया जंगले पाटील म्हणाल्या, शरद पवार यांचा त्याग, जनमानसातील त्यांची प्रतिमा लक्षात घ्यायला हवी. या वयात असा त्रास त्यांना व्हायला नको होता. ईडीच्या भीतीने ग्रासलेली व कमर्शियल माइंडची मंडळीच अजित पवार यांच्याबरोबर जातील.

कैलास पाटील हे पूर्वी शिवसेनेत होते. छगन भुजबळ यांनी बंडखोरी केली, तेव्हा ते त्यांच्याबरोबर होते. ते राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष झाले, तेव्हा त्यांचे वर्णन छगन भुजबळ यांचा कार्यकर्ता असेच करण्यात आले. जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर ते मराठवाडा पदवीधर आमदार सतीश चव्हाण यांच्या जवळचे अशी त्यांची प्रतिमा बनली. ते सांगतील तेवढेच ते काम करू लागले. याबाबत तक्रारीही वाढल्या. आता छगन भुजबळ व सतीश चव्हाणही अजित पवार यांच्यासमवेत असल्यामुळे कैलास पाटीलही त्यांच्यासमवेतच असणार, असा राजकीय होरा व्यक्त होत आहे.

 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारAurangabadऔरंगाबाद