शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
2
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
3
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
5
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
6
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
9
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
10
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
11
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
13
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
14
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
15
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
16
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
17
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
18
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
19
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

वाळूज एमआयडीसीत हातमोज्याच्या कंपनीला भीषण आग; सहा जणांचा होरपळून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2023 07:35 IST

Maharashtra Gloves Manufacturing Factory Fire: आग लागल्यानंतर इमारतीतून लोक मदतीसाठी आरडाओरडा करताना दिसले होते.

Maharashtra Gloves Manufacturing Factory Fire ( Marathi News ) छत्रपती संभाजीनगमधील एमआयडीसीमध्ये हातमोजे बनविणाऱ्या शनिवारी मध्यरात्री २ वाजता भीषण आग लागली. या आगीत सहा कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. 

या आगीने ३ वाजता रौद्र रूप धारण केले. यात १५ कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून, ६ कर्मचाऱ्यांना घाटी रुग्णालयात बेशुद्धावस्थेत हलविण्यात आले होते. अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वाळूज औद्योगिक वसाहतीमधील २१५-१६ सेक्टरमध्ये हँड ग्लोव्हज तयार करणारा सनशाईन इंटरप्राईज हा कारखाना आहे. यात २०० हून अधिक कर्मचारी काम करतात. शनिवारी मध्यरात्री रच्या सुमारास कंपनीत मोठा स्फोट झाला. काय झाले, हे कळायच्या आत कंपनीतून मोठ्या प्रमाणात धूर निघण्यास सुरुवात झाली. काही क्षणात कंपनीला आगीने वेढले. 

वाळूज एमआयडीसी परिसरात असलेल्या कारखान्याला आग लागली असून कामगार अडकल्याचे स्थानिकांनी कळविले होते. आग लागल्यानंतर इमारतीतून लोक मदतीसाठी आरडाओरडा करताना दिसले होते. कंपनीत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने सांगितले की, इमारतीत सहा कर्मचारी अडकले आहेत. भुल्ला शेख (65), कौसर शेख (26), इक्बाल शेख (26) आणि मगरूफ शेख (25) अशी अडकलेल्या चार कर्मचाऱ्यांची नावे आहेत. 

सहायक पोलीस आयुक्त अशोक थोरात, अग्निशमन विभागाचे वैभव बाकडे यांनी धाव घेतली. थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार, साधारण १ वाजून २० मिनिटांनी कंपनीला आग लागल्याची माहिती मिळाली, अग्निशमन विभागाने धाव घेईपर्यंत कंपनीला चहूबाजूंनी आगीने वेढले होते. आग वाढेपर्यंत जवळपास १६ ते १८ कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळाले. सहा जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून आग विझविण्याचे काम सुरु असल्याचे अग्निशमन दलाचे अधिकारी मोहन मुंगसे यांनी सांगितले. 

टॅग्स :fireआगFire Brigadeअग्निशमन दल