शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगर अनैतिक मानवी तस्करीचा ट्रान्झिट पॉइंट बनले; नीलम गोऱ्हे यांचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 19:59 IST

नीलम गोऱ्हेंच्या बालगृहांसाठी पोलिस दक्षता समिती स्थापन करण्याच्या सूचना

छत्रपती संभाजीनगर : शहरातील बारवर आतापर्यंत पोलिसांनी धाडी टाकल्या. त्यात बांगलादेशी मुली पकडल्या गेल्या. ही अनैतिक मानवी तस्करी आहे. हे शहर त्याचा ट्रान्झिट पॉइंट बनले आहे. याबाबत अधिक माहिती घेण्याबाबत पोलिस आयुक्तांना सांगितले, असा खळबळजनक खुलासा विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गुरुवारी येथे केला.

डॉ. नीलम गोऱ्हे आणि महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी गुरुवारी भगवानबाबा बालिका आश्रम, सावली मुलींच्या बालगृहास भेट देऊन तेथे मुलींना मिळणाऱ्या सेवा-सुविधांची पाहणी केली. याबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रपरिषदेत त्या बोलत होत्या.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, ज्या मुली अनाथ, ‘पोक्सो’च्या बळी आहेत त्यांना चुकीचे मार्गदर्शन मिळते आणि त्याला या मुली बळी पडतात. त्यामुळे त्यांना बंधने नको असतात. यावर बालगृहातील मुलींना वैयक्तिक समुपदेशनाची गरज आहे. संभाजीनगरच्या पोलिस अधीक्षकांशी आम्ही बोललो. शहरात प्रत्येक पोलिस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांची महिला दक्षता समिती नेमण्याच्या सूचना केल्या आहेत. या समितीने महिन्यातून एकदा बालगृहांमध्ये जाऊन तेथील मुलींशी संवाद साधावा, त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात. पाहणी हा हेतू न ठेवता आम्ही तुमच्यासोबत आहोत, ही भावना ठेवावी. महिला व बालविकासासोबत महसूलसह इतर खात्यांनीही यात काम केले तर चांगले फलित निघेल.

चिंतेची बाबशहरात जुन्या ‘पोक्सो’च्या गुन्ह्यांमध्ये गुन्हेगार अजूनही सापडलेले नाहीत. ही गंभीर बाब असल्याचे नीलम गोऱ्हे यांनी म्हटले. पोलिसांनी याबाबत आढावा घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

पुन्हा आई झाल्यासारखे वाटलेत्या म्हणाल्या, “बालगृहातील मुलींना भेटल्यावर पुन्हा आई झाल्यासारखे वाटले. त्यांच्या डोळ्यांत मला स्वप्नं दिसली. या मुलींच्या आपल्याकडून काही अपेक्षा आहेत. त्यांना कौशल्यविकासाचे प्रशिक्षण हवे आहे. बालमहोत्सवात त्यांना सहभागी व्हायचंय, त्यांना कबड्डी, खो-खो खेळायचेय. या मुली उद्या समाजाचे नेतृत्व करू शकतात, त्या ‘नकोशा’ नाहीत. सावली बालगृहातील एका मुलीला ९व्या इयत्तेत ९१ टक्के मिळालेत. तिची खूप मोठी स्वप्नं आहेत. यावेळी मुलींना आम्ही त्या रोज काय खातात इथपर्यंत विचारले. त्यांनीही मनमोकळेपणाने आमच्याशी संवाद साधला. शहरात मुलींचे निरीक्षणगृह सुरू करण्याबाबतही हालचाल सुरू असल्याचे सूतोवाच गोऱ्हे यांनी केले.”

नीलम गोऱ्हे यांच्या अभ्यास गटातील मेघना भोसले, अस्मिता राजे, रोहिणी ठोंबरे, विद्या डाडर, प्रतिभा राऊत या सदस्यांचाही बालगृहातील संवादात समावेश होता.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारी