शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

हवाहवाई ! मोठ्या विमानांसाठी छत्रपती संभाजीनगर होणार सज्ज, विस्तारीकरणाला वेग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 19:38 IST

विस्तारीकरणात धावपट्टी मोठी झाल्यानंतर अधिक क्षमतेची विमाने येथे उतरू शकतील, ज्यामुळे शहराच्या हवाई कनेक्टिव्हिटीत मोठी वाढ होईल.

छत्रपती संभाजीनगर : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी १३९ एकर जमिनीचे भूसंपादन केले जाणार आहे. भूसंपादनासाठी ८७.८२ कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला वितरित करण्यास मंगळवारी शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली. विमानतळाच्या विस्तारीकरणात प्रामुख्याने धावपट्टीची लांबी वाढणार आहे. यातून मोठ्या विमानांच्या उड्डाणांसाठी विमानतळ सज्ज होईल.

चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्तारीकरणाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. चिकलठाणा, मुकुंदवाडी, मुर्तुजापूरमधील ५६.२५ हेक्टर म्हणजेच १३९ एकरांत विस्तारीकरण होणार आहे. या विस्तारीकरणासाठी जमीन संपादित करण्यासाठी आणि त्यापोटी होणाऱ्या ५७८.४५ कोटी रुपयांच्या खर्चास नोव्हेंबर २०२३ मध्ये शासन निर्णयाद्वारे प्रशासकीय व वित्तीय मान्यता मिळाली होती. टप्प्याटप्यात निधी मिळत आहे. निधीचा मार्ग मोकळा होत असल्याने विस्तारीकरणाला गती मिळेल, अशी अपेक्षा आहे. नव्या वर्षात भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे.

विस्तारीकरणात धावपट्टी मोठी झाल्यानंतर अधिक क्षमतेची विमाने येथे उतरू शकतील, ज्यामुळे शहराच्या हवाई कनेक्टिव्हिटीत मोठी वाढ होईल. विस्तारीकरण पूर्ण झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय विमानसेवा, तसेच अधिक प्रवासी क्षमतेच्या विमानांची ये-जा होईल. यामुळे मराठवाड्यातील हवाई वाहतुकीला नवे बळ मिळेल, तसेच गुंतवणूक आणि पर्यटनाच्या संधींनाही चालना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

धावपट्टीची स्थिती...- विमानतळाची धावपट्टी सध्या ९ हजार ३०० फूट लांबीची आहे. सध्या छोट्या आणि मध्यम आकाराची विमाने उड्डाण करीत आहेत.- जास्त प्रवासी वाहतूक करणाऱ्या जम्बो विमानांच्या उड्डाण करण्यासाठी १२ हजार फुटांच्या धावपट्टीची गरज राहणार आहे.- त्यानुसार १२ हजार फुटांपर्यंत धावपट्टी विस्तारीकरणाचा प्रस्ताव असून, २७०० फुटांसाठी भूसंपादनाची गरज आहे. ८२५ मीटर लांबीची धावपट्टी नव्याने होणार आहे.

भूसंपादनाची नोटीस निघेल‘१९ अ’प्रमाणे भूसंपादनाची नोटीस पुढच्या आठवड्यात निघेल. त्यानंतर भूसंपादन प्रक्रिया सुरू होईल.- व्यंकट राठोड, उपविभागीय तथा भूसंपादन अधिकारी

English
हिंदी सारांश
Web Title : Aurangabad Airport Expansion: Readying for Bigger Planes with Runway Extension

Web Summary : Aurangabad Airport's expansion gains momentum with land acquisition approval. Runway extension will accommodate larger aircraft, boosting connectivity and tourism in Marathwada. The project includes extending the runway to 12,000 feet, requiring 2,700 feet of additional land. Land acquisition notices will be issued soon.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAirportविमानतळ