शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

छाजेड कुटुंब हल्ला प्रकरण : हल्ला करणारा नव्हे; पण गच्चीवर रॉड सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 13:57 IST

आरोपीने गुन्ह्यात वापरलेला लोखंडी रॉड सापडल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

ठळक मुद्देछाजेड यांच्या प्रकृतीत सुधारणालवकरच घेणार जबाब

औरंगाबाद : उच्चभ्रू वसाहत रघुवीरनगरातील उद्योजक पारस छाजेड यांच्यासह कुटुंबियांवर हल्ला करणारा आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागला नाही; परंतु आरोपीने गुन्ह्यात वापरलेला लोखंडी रॉड सापडल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. रॉड कधी सापडला याविषयी गुन्हे शाखा, तसेच स्थानिक पोलिसांनीही माहिती देण्यास नकार दिला. 

पारस छाजेड यांची भेट घेण्यासाठी पोलीस पथकाने प्रयत्न केले; परंतु त्यांना भेटण्यास व विचारपूस करण्यास डॉक्टरांनी परवानगी नाकारलेली आहे, शशिकला व पार्थला रुग्णालयातून सुटी झाली आहे, अशी माहिती पोलीस सूत्राकडून मिळाली आहे. हल्ला झाला त्याच्या दोन दिवसांनंतर गुन्हे शाखेने बंगल्याच्या सर्व बाजूंची तपासणी केली त्यावेळी रॉड मिळाल्याचे म्हटले जाते. शिवाय हा रॉड छाजेड यांच्या इमारतीच्या छतावर सापडल्याची चर्चाही आहे. रॉड ‘थेअरी’ सांगून पोलिसांचा तपास नेमका भरकटतो आहे की काय, असा सवाल उपस्थित होत आहे. आरोपीने हल्ला का आणि कशासाठी केला याचे कोडे अद्याप पोलिसांना उलगडलेले नाही. 

लोखंडी रॉड जप्तपहिल्या दिवसापासून विविध पथकांनी छतावर व इतरत्र पाहणी केली असून, आठ दिवसांनंतर गुन्हे शाखेच्या पथकाला बंगल्याच्या छतावर रक्ताने माखलेल्या अवस्थेतील लोखंडी रॉड सापडला आहे. तो रॉड फॉरेन्सिक लॅबला पाठविण्यात आला असून, हल्ल्यात तोच रॉड होता का हे तपासणी अहवालानंतरच सांगता येईल, असा दुजोरा पोलीस उपायुक्त डॉ. राहुल खाडे यांनी दिला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFamilyपरिवारAurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीस